मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
शुभवदने

पद - शुभवदने

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल -- टाकुनि गेला सखा )
शुभवदने, तुज काय म्हणावें ।
पुढिल शुभाशुभ, ध्यानिं अणावें ॥धृ०॥
संसार कांहि, सुखकर नाहीं ।
उगी या पाईं, काय शिणावें ॥ शुभ० १॥
किती हित झालें, किती वय गेलें ।
किती पुढें उरलें, हें जाणावें ॥ शुभ० २॥
कैचें सुखाचें, झाड विखाचें ।
मुळ दुःखाचें, समुळ खणावें ॥ शुभ० ३॥
संभ्रम सोडी, निजहित जोडी ।
जुंपुनि गाडी, बैल हाणावें ॥ शुभ० ४॥
विष्णूदासाचें, मत साचें ।
जगज्जननिचे गुण वर्णावें ॥ शुभ० ५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP