भूपाळी - भूपाळी २
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
उठ जगदंबे ! आई लवलाही ॥धृ०॥
कशी निजलिस एकटी या घटकीं ।
देऊनि झटकी मुलाही ॥ उठ० १॥
निर्वाण पहाण्याची, लपण्याची नूतन ।
लागली संवय तुलाही ॥ उठ० २॥
निजब्रीद बुडविसी, उगी रडविसी ।
यामधें काय भलाई ॥ उठ० ३॥
विष्णुदास म्हणे, रेणुके, तुजविण ।
होतसे जीव लाही लाही ॥ उठ० ४ ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP