मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
श्रीरेणुकेची प्रार्थना

पद - श्रीरेणुकेची प्रार्थना

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


श्रीमन्मंगलदायके । श्रीमूळपीठनायके ॥
माझी विनंति आयके । माझे आई रेणुके ॥१॥
नारायणी श्रीशंकरे । अन्नपूर्णे विश्वंभरे ॥
कृपा करणें हेंचि बरें । माझे आई रेणुके ॥२॥
माया ममता वाढवी । पुत्रापरी लाडवी ॥
दुःखापासुनी सोडवी । माझे आई रेणुके ॥३॥
भूमंडळीं या वासरा । तुझ्या वांचुनी दुसरा ॥
पहा पहा नसे आसरा । माझे आई रेणुके ॥४॥
सखे ! धांवुनि ये गडे । नेई झांकुनि लुगडें ॥
ठेऊं नको मज उघडें । माझे आई रेणुके ॥५॥
गंभीर गुण चांगले । वेद वर्णितां भागले ॥
तुझें ध्यानचि लागलें । माझे आई रेणुके ॥६॥
पदारविंद पाहुं दे । सदा सद‍गुण गाऊं दे ॥
सदा सन्निध राहुं दे । माझे आई रेणुके ॥७॥
परमानंदें डोलणें । स्नेहधर्मानें चालणें ।
आतां किती हो बोलणें । माझे आई रेणुके ॥८॥
अंबे ! सांगणें इतुकें । प्रेमें प्रेमाचें भातुकें ॥
देवोनि तोषवी कौतुकें । माझे आई रेणुके ॥९॥
आतां कुरंगडोळसे । पाजुनियां पाडसें ॥
निद्रा करी हो राजसे । माझे आई रेणुके ॥१०॥
वेगें मला भेट देई । तुझ्या लागतों मी पायीं ॥
विष्णुदास म्हणे बाई । माझे आई रेणुके ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP