मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
आम्ही चुकलों

पद - आम्ही चुकलों

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : नको करुं धरुं मनामधें आढी. )
आम्ही चुकलों जरी तरी कांहीं
तूं चुकूं नको अंबाबाई ! ध्रु०॥
तुझें नांव ‘ आनंदी ’ साजे
तुझा महिमा त्रिभुवनीं गाजे
तुझें सगुणरुप विराजे
तुला वंदिति सन्मुनि, राजे
गुण गाति वेदशास्त्रेंही ॥ आम्ही० ॥१॥
आम्ही अनाथ, दीन, भिकारी
तूं समर्थ, प्रभु, अधिकारी
आम्ही पतित पातकी भारी
तूं पावन भवसंभारीं
तूं पर्वत, आम्ही रज - राई ॥ आम्ही० ॥२॥
आम्ही कुपुत्र म्हणउन घेऊं
तूं नको कुमाता होऊं
आम्ही विषय - ढेकळें खाऊं
तूं प्रेमामृत दे खाऊं
आम्ही रांगूं, तूं उभि राही ॥ आम्ही० ॥३॥
आम्ही केवळ जडमूढप्राणी
चैतन्यस्वरुप तूं शाहाणी
फट्‍ बोबडी आमुची वाणी
तूं वदुं नको आमुच्या वाणी
आम्ही रडुं, तूं गाणें गाई ॥ आम्ही० ॥४॥
आम्ही चातक तुजविण कष्टी
तूं करीं कृपामृतवृष्टी
म्हणे विष्णुदास धरि पोटीं
अपराध आमुचे कोटी
अशि आठवण असुं दे ह्रदयीं ॥ आम्ही० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP