भूपाळी - भूपाळी ३
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
निजलिस कां रेणुके ! ॥ध्रु.॥
माझ्या आयुष्याची लुट । काळें केली सांगूं कुठं ।
नको जाऊं झोंपी उठ । मुळपीठ नायके ॥ निज० १॥
मनाजी हा आत्मद्रोही । घर भेदील कां डोही ।
याचें कर्म तुज बाई । कां नाहीं ? ठाऊकें ॥ निज० २॥
कामक्रोधादिक सहा । शत्रु चंड मुंड महा ।
सिंहारुढ होऊनि पहा । जय महाकालिके ! ॥ निज० ३॥
अनाथांचा प्रतिपक्ष । धरुनिया मज रक्ष ।
निज ब्रीदाकडे लक्ष । दे मोक्ष - दायके ॥ निज० ४॥
अपराधी मी वरिष्ठ । कृपा करणें तुज इष्ट ।
विष्णुदास एकनिष्ठ । म्हणे गोष्ट आयके ॥ निज० ५ ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP