मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
समज बाई

पद - समज बाई

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


समज बाई । आई मुलावीण लटकी ॥धृ०॥
तूं दीन जननी, दीन जनास्तव । वससी या मूळ पिठकीं ॥१॥
भूप प्रजानन, मंडित शोभे । शोभत रणशूर कटकीं ॥२॥
पाहूं नको निरवाण तुझ्या या । पडली मुलावर पटकी ॥३॥
बिन आइ होशिल, कुणीकडे पहाशिल । बसशील कीं येकट कीं ॥४॥
अविनय कोटी, परि निज पोटीं । घे, गिळुनी गटगट कीं ॥५॥
विष्णुदास म्हणे, जय जगदंबे । दे, ममतामृत घुटकी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP