मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
खचितचि मग तूं

पद - खचितचि मग तूं

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल - झाली ज्याची उपवर )
खचितचि मग तूं, माय कशाची ।
नाहिं तुला जरि, माझि आशाची ॥धृ०॥
वाढविलें दहीं, दुध पाजुनि ज्या । त्या मुखीं ओपिसी, धार विषाची ॥१॥
बळें काळापुढें, ढकलुनि देसी । ओढुनि घेसी, मांडि उशाची ॥२॥
भेट न देसी, जवळ न घेसी । वाटच दाविसी, दुरदेशाची ॥३॥
कां षड्रिपुची, खोड न मोडिसी । गांठ न सोडिसी, भवपाशाची ॥४॥
त्रिभुवननायके ! काय तुला जड । वाटली माझी, भीक पशाची ॥५॥
विष्णुदास म्हणे, पतित मुखानें । म्हणवुन घेऊं, नको कर्कशाची ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP