|
न. १ कांचन ; सुवर्ण ; पिवळ्या रंगाची जड व मोलवान अशी एक धातु . २ दसर्याचे दिवशी सीमोल्लंघन करु आल्यावर इष्टमित्रांस देण्यासाठी आणलेलीं आपट्याचीं पानें . वि . १ मालेवान ; किंमतीचा ; महत्त्वाचा ; सोन्यासारखें मूल . २ ( चुकीनें० साणें ; उजेडाकरिता राखलेला धाब्यांतील भोकसा . [ सं . सुवर्ण ; फ्रें . जि . सोवन , सोर्न ; पोर्तु . जि सोनकै ] ०म्ह० सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरी घालावी ? ( वाप्र .) ०आणि - उपयुक्त व सुंदर ; फायदेशीर व दिखाऊ . सुंगध - उपयुक्त व सुंदर ; फायदेशीर व दिखाऊ . ०होणें मरणोत्तर उत्तम गति प्राप्त होणें , चागलें , चांगल्या परिस्थितीत मरण येणें . सोन्याचा धूर , पाऊस निघणें पडणें , सोन्यानें दांत किसणें अतिशय श्रीमंती असणें . सोन्याहून पिवळा अतिशय उत्तम , बावन कसी सोनें --- उत्तम , मुळींच हीण - कस नसलेलें सोनें . २ ( ल .) उत्तम , शुद्ध वर्तनाचा , प्रामाणिक मनुष्य , किंवा वस्तु . सोनें गाळणें --- सोन्याचा रस करुन आंतील भेसळ काढणें . कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें --- सोने उजळतांना सवागीचा उपयोग करतात . त्यावरुन एखादें मह्त्कृत्य घडवून आणण्यांत महत्त्वाच्या गोष्टीप्रमाणें अनुषंगिक गोष्टीचेंहि सहाय्य होणें , थोराप्रमाणें हलक्याचेंहि सहाय्य लागणें . सोन्याचा दिवस - पु महत्त्वाचा , आनंदाचा दिवस . सोन्याची सीता --- स्त्री . ( बायकी ) ( ल .) नवर्याची लाडकी म्हणून नखशिखांत दागिण्यांनीं नटविलेली स्त्री . सोन्याचे दरवाजे होत व ठसठसां लागोत --- ( व .) मुलगा कसा असेना पणा होवो मग तो त्रासदायक झाला तरी चालेल . असेना पण वाचो . सोन्यार्चे हाड - न . नेहमी उत्कर्ष , भरभराट होणारा माणूस , सामाशब्द --- सोनओळख , सोनवळख , सोनवळखी --- स्त्री . दसर्याचे सोनें ( आपट्याचीं पानें ) वांतताना झालेली तोंडओळख , ०कळी स्त्री. सोनचाफ्याच्या कळ्यांसारखा केलेल्या सोन्याच्या कळ्यांचा हार ०काव स्त्री , एक जातीचा गेरु . कावळा पु . १ कुक्कुटकुंभा ; भारद्धाज २ ( र्को .) कृष्ण - कावळा . ३ पांढरा कावळा ( काल्पनिक ). ०कावळा --- ( बालभाषा ) आई विटाळशी होणें . शिवर्णे --- ( बालभाषा ) आई विटाळशी होणें . ०किडा पु. काजवा ; कोणताहि चमकणारा किडा ०कुला , सोना , सोनान्या --- वि . लाडका ( मुलगा ). सोनक्या , सोना , सोनान्या --- वि . लाडका ( मुलगा ). ०केतक केतकी --- स्त्री . केळीची एक जात . ०केळ स्त्री. एक चांगल्या जातीची केळ . - न . सोनकेळीचें फळ . हें पिवळें धमक व गोड असतें . - खत - खात - न . माणसाच्या विष्टामूत्राचें खत . ०चड चडी ; सोनचिडी सोनचेडी --- स्त्री . १ ( को .) डोंबार्याची ( कोल्हाट्याची ) चिमणी ; खेळ करणारी बायको , बाहुली . २ एक जातीची चिमणी . ३ ( गो .) वयस्क कुमारी ; घोडनवरी . ०चाफा चापा --- पु . एक जातीचें चाफ्याचें झाड . याच्या फुलास सोनचापें ( फें ) म्हणतात . याचा रंग पिवळा व वास मधुर असतो . जुई --- स्त्री . पिवळसर फूल येणारे जुई व तिचे फूल ट्का - क्का --- पु . १ एक फूलझाड व त्याचें पिवळसर फूल . २ एका प्रकारचे जुनें सोन्याचें नाणें ; ( त्यावरुन ) सोन्याचा तुकडा . ३ आवडत्या मुलास म्हणतात . ४ ( विणकाम ) आरसड व गोल यांचेमध्यें अडकविलेला एक दगड . ०तरवड पु. एक जातीचा ( पिवळा व तांबडा ) तरवड . शंकाशूर पहा . ०ताव पु. १ घोड्याचा पाय दुखावला असतां , तापलेल्या तव्यावर त्याचा पाय ठेवून वर पाणी ओतून द्यावयाचा डाग , २ सोनें तापवून पाण्यात न बुडवितां निवूं देणें ३ एखाद्याची खरडपट्टी काढणें ; गालीप्रदान करेणं ( क्री०बसणें ; देणें ) ०पावडा वि. ( कुत्सितार्थीं ) गरीब ; दुर्दैवी ( माणूस ). ०पितळ न. स्त्री . उत्तम , चमकणारे पितळ ( धातु ) ०फळ स्त्री. एकजातीचें भात , साळ . ०मळी स्त्री उंसाचा रस कढवितांना ढोरमळीच्या नंतर येणारी मळी . ०वणी न. सोनें तापवून तें ज्यांत बुडविलें आहे असें पाणी ; हें बाळंतीण किंवा आजारी माणसास देतात ०वेल स्त्री. १ एक जातीचे भात , २ अमरवेल ; आकाशवेल ; दाभणाएवढी जाड , वृक्षावर पसरणारी , सोन्यासारखे पिवळ्या रंगाचे बारीक धागे असणारी , शेरावर वाढणारी वेल . ३ ( ल .) शेळी ; मेंढी ( यांच्या व्यापारानें बराच पैका मिळतो यावरुन ). ४ ( ल .) नागवेल ( हिच्या पानांच्या व्यापारापासूनहि बराच पैका मिळतो यावरुन ) ०वै स्त्री. ( महानु .) सोन्याची वात . कीं सोनवै कैवल्यपथा। पाजळली ते। रेशमी किंवा जरतारी ( कापड , पीतांबर ). कासे सोन सळा पांघरे पाटोळा। घननीळ सावळा बाइयानों। २ पिवळसर ( केस , गहूं , घोडा इ० ). सोनुला वि . सोनकुला पहा . सोर्नेनाणें - सोनेंवाणें न . सोनें , रुर्पे इ० विषय ; सोन्याचे दागिने व नार्णे किंवा रोकड . सोनेरी वि . सोन्याच्या रंगाचें ; सोन्याचें ; आंत सोनें असलेलें ( वर्खं , शाई , कलाबतू , मुलामा , रंग , वेलबुट्टीचा कागद इ० ). सोनेरी टोळी स्त्री . दुसर्याला हरतर्हेनें फसवून लुबाडणारी धाडशी लोकांची टोळी . सोनोळळें सोनकेळ - ळें पहा . सोन्नारिंग न . ( गो .) मोसंबे फळ . [ सोनें + नारिंग ]
|