देखत होते आधी मागे पुढे सकळ मग ही दृष्टी गेली वर आलेसे पडळ, तिमीर कोंदलेसे वर वाढता प्रबळ । भित मी झालो देवा काय झाल्याचे फळ । आता मज दृष्टी देई पांडूरंग मायबाप ॥१॥
शरण मी तुला आलो निवारूनिया पापा । अंजन लेववोनी करी मार्ग सोपा । अंजन लेववोनी जाईन सिद्धपंथे ॥२॥
होतसे खेद चित्ता काही न आठवे विचार । जात होतो जनामागे तोही सांडिला आधार । फिरले माझे मन कोणी ना देती आधार ॥३॥
गुंतलो या संसारी कसा झालासे अंध । मी माझे वाढवोनी माये कृष्णेचा बाध । स्वहीत न दिसेची केला आपुला वध । लागला काळ पाठी सवे कामही क्रोध ॥४॥
जोवरी चळग गा तोवरी म्हणती माझे माझे मानीती लहान थोर देह सुखाचीया का जा इंद्रिय मावळली आला बागुल आजा फिरले माझे मन तो देह नो हे दुजा ॥५॥
लागती चालता ग गुण द्वेषाच्या ठेचा । सांडिली पाट मार्ग कैसा झालोसे निराळा । पाहता वास तुझी थोर धरूनीया आशा तुका म्हणे वैद्यराजे पंढरीच्या निवासा ॥६॥