पाहुणी आली माझ्या घरी, अबिका माया जगदीश्वरी ॥धृ॥
या डोळ्यांच्या दोन रांजणी, पस्ताव्याचे भरले पाणी, त्या पाण्याने न्हाऊ घालिते बसवूनी पाटावरी ॥१॥
रक्तामधले इमान बळकट त्याचा भाळो भरते मळवट, भलेपणाचे जिणे ठेविते वाकूनी पायावरी ॥२॥
चुका चाकवत केली भाजी, भाव भक्तीची भाकर ताजी, लेक दरीद्री तुझा विनविते आई भोजन करी ॥३॥