नमिला श्री गणनाथ मंगलदायक हा ॥धृ॥
पिवळा पितांबर रशी कशी कटिला दोंद मी राजीक पहा अहो हरी तोंद राजीक पहा ॥१॥
गळ्यामध्ये मोत्याची कंठी शोभे मोत्याची कंठी गळ्यामध्ये शोभे-कुंडलाची प्रभा पहा ॥२॥
सोन्याचे कडे तोडे हातामध्ये शोभेपवचा झळकती पहा ॥३॥
सोन्याच्या सिंहासनी गणराज बैसे रिद्धी सिद्धी दासी उभ्या अहो हरी रिद्धी सिद्धी दासी उभ्या ॥४॥