चार कोटी ऐक लक्षाचा शेवट । चोवीस सहस्त्र स्पष्ट सांगितले ॥१॥
सांगितले तुका कथुनिया गेला । बारा अभंगाला सोडू नका ॥२॥
सोडू नका तुम्हा सांगितले वर्मे । भवपाशी कर्मे चुकतील ॥३॥
चुकती यातायाती विठोबाची आण । करावे पठण जीवेभावे ॥४॥
जीवे भावे करीता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥५॥