पावलो पंढरी वैकुंठ भुवन, धन्य आजी दिन सोनियाचा ॥धृ॥
पावलो पंढरी आनंदे गजरी, वाजतील दुजे शंख भेरी ॥१॥
पावलो पंढरी क्षेत्र आलिंगूनी संत या सज्जनी निववील ॥२॥
पावलो पंढरी पार नाही सुखा भेटला तो सखा पांडुरंग ॥३॥
पावलो पंढरी आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे ॥४॥