दही दूध तूप लोणी । करून देतो चक्रपाणी । घडीभर राही सजना करू दे मंथना । सोडी रवीचा हाथ माझा कान्हा करू दे मंथना ॥१॥
दारी उभी गोपिका । मारीत्याती तुजला हाका । आली वेडी राधा । दाखवी खुणा ॥२॥
हाथी घेवूनी या वाटी । गोपाळांना लाह्या वाटी । जायी यमुनेचा काठी उभी राधिका ॥३॥
करूनी घराची सारावारी बसले होत सहज घरी । जमवूनी सार्या नारी जाई यमुना तीरी मुरली वाजवी कान्हा ॥४॥