ज्याची त्याला पदवी इतरा न साजे । संताला उमजे आत्मसुख ॥१॥
आत्मसुख घ्यारे उघडी ज्ञानदृष्टी । यावीण चावटी करू नका ॥२॥
करू नका काही संत संग धारा । पूर्वीचा जो दोर उगवेल ॥३॥
उगवेल प्रारब्ध संतसंग करूनी । प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥
वर्णियेले एक गुण नामघोष । जातील रे दोष तुका म्हणे ॥५॥