उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर ॥धृ॥
करावयास्तव मंगलपूजा देहदीप मी जाळीन माझा भावभक्तीचा हा नजराणा स्विकारुणी घ्यावा ॥१॥
धूप जाळीते मी श्वासाचा, सुगंध पसरीन मंगलतेचा, मंगलपद हृदयावर ठेवीत प्रभु माझा यावा ॥२॥
अभंग नाही नाहीं ओवीं, मुकजीवाने कशीरे गावी, नयनामधले अश्रु करीती अखरेच्या धावा देवा, उघड नयन देवा ॥३॥