सहस्त्ररूपे तुम्ही सदाशिव श्रवणासी बैसला, सांगतो परिसा शिवलीला ॥धृ॥
प्रसन्न हो मज हे वाग्देवी, व्यास महर्षि कृपा असावी, सुरस कथा ही सजीव व्हावी । श्रवणीचे सुख सार्थ असावे मला लोचनाला ॥१॥
स्थळकालासह व्यक्ति व्यक्ति, करोत नर्तन नयना पुढती, श्रवणे उपजो मनांत भक्ति, रविप्रभेसम विस्तारावा आशय शब्दातला ॥२॥