सत्य सत्य जाण त्रिवाणा नेम हा पदोपदी ॥१॥
पदोपदी पहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पाऊले विठोबाची ॥२॥
विठोबाचे भेटी घडेल बा चित्त । तुम्हालागी आतां सांगितले ॥३॥
सांगितले खरे विश्वाचिया हिती । अभगा वाचिती जे का तर ॥४॥
नर पठणी जिवन्मुक्त झाले । पुन्हा नाही आले संसारासी ।
संसार उडाला सदेह फिटला पूर्ण तोची झाला तुका म्हणे ॥५॥