मनोहर रूप तुझे देवा मला दाव । जुनी पुरानी नाव माझी किनार्याला लाव ॥१॥
पापाचे पर्वत बाई पुण्याचा लेष नाही, नऊ महिने गर्भी असतानाही नाही आठवले नाव ॥२॥
कल्पनेच्या उसळती लाटा झोका खात खात, मध्यावरी आली आता बुडूनची जाई नाव ॥३॥
पुरे पुरे संसार यातना होती ज्यात अपार, तुमच्या वाचून नाही देवा कोणाचा अधार ॥४॥
नामदेवाने हट्ट धरिला जेविले पंढरीराव, जनी म्हणे आता तरी देवा मला पाव ॥५॥
पुरानी नाव माझी किनार्याला लाव, मनोहर रूप तुझे देवा मला दाव ॥६॥