जे जे पडेल संकट ते ते निवारील निलकंठ चौदा अध्ययाचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहीले असे ॥१॥
प्रथमाध्यायी मंगलाचरण दाशार्हरायाचे आख्यात कलावतिचे पति उद्धरिला पूर्ण हेची कथन निर्धारे ॥२॥
द्वितियाध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन, तिसर्यात गौतमे कथा सांगोन कल्माष पाद उद्धरिला ॥३॥
चौथ्यात महाकाळा लिंगार्चन गोप बाळ गेला उद्धरून पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्यी स्थापिला शिवप्रसादे ॥४॥
सहावा अध्याय अतिरसिक सिमंतीनी अख्यान पुण्यकारक । सातवा अध्याय सुरस कौतुक, भद्रायु राजाचे कथन पै ॥५॥
नवमांत वामदेवांचे आख्यान सुरसदुर्जय राजा झाला राक्षस, जन्म दु:खे कथिति बहुवस । अति सुरस अध्याय तो ॥६॥
दहाव्यांत शारदा आख्यान । अकराव्यत रुद्राक्षमहिमा पूर्ण । महानंदा गेले उद्धरोन । भद्रसेन राव तरला ॥७॥
बाराव्यांत विदूरबहुला उद्धार, विष्णुने मर्दिला भस्मासूर । तेराव्या अध्यायात समग्र शिवगौरे विवाह पै ॥८॥
चौदाव्यात शिव अर्पणा विनोद गौरी भिल्लीणी झाली प्रसिद्ध । पुढे श्रियाळ चरित्र अगाध । क्षिरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्ववा ॥९॥
तेथूनी अत्रीऋषी प्रसिद्ध, पुढे पुर्णब्रह्म दत्तात्रेय अगाध, त्यापासून सदानंद । रायानंदय ती तेथूनी ॥१०॥
तेथूनी अमलानंद गंभीर । मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार । सहसनंदा यतीन्द्र पै ॥११॥
नेथूनी पुर्णानंद यती शुद्ध । त्यापासाव पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध । ब्रह्मानंद यतींद्र जो ॥१२॥
पंढरीहून चारी योजने दूरी । नैऋत्यकोणी नाझरे नगरी । तेथील दशलेखक निर्धारी पुर्वांश्रमी ब्रह्मानंद ॥१३॥
पुढे पंढरीसी येऊनी । केले तेथे संन्यास ग्रहण । तेथेची समाधिस्त होऊन अक्षय वस्ती केली पै ॥१४॥
तो ब्रह्मांनंद माझा पिता । सावित्री नामे माझी माता । वंदनी त्या उभयता । शिवलीलामृत ग्रंथ संपविला ॥१५॥
शके सोळाशे चाळीस । विलंबी नाथ संवत्सराया । शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास । रविवारी ग्रंथ संपविला ॥१६॥
ब्रह्मकमंडलूच्या तिरी । द्वादशमती नाम नगरी । आद्यंत ग्रंथ निर्धांरी । तेथे झाला जाणिजे ॥१७॥
शिवलिलामृत ग्रंथ । आद्यंत चर्तुदश अध्याय पर्यत । जयजय शंकर उमानाथ । तुज प्रीत्यर्थ हो का सदा ॥१८॥
अर्पण-जीवना कर्पुरगौरा । ब्रह्मानंदा जगतद्द्वारा । श्रीधर हृदयाला भ्रमरा । अक्षय अभंगा दया निधि ॥१९॥
शिवलिलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंध पुराण ब्रह्मोत्तर खंड । परिसोत सज्जन अखंड चर्तुदशांध्याय गोड हा ॥२१॥
ओव्या एकंदर इतिशिवलीला मृत समाप्तम् ॥ श्रीसांबसदाशिवार्णपमस्तु ॥