कैवल्याचा जिव्हाळा प्रगटला बहु स्थळा । चैतन्याचा पुतळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शनी आहे ताप । सर्वघटि सुखरूप ज्ञानोबा माझा ॥१॥
रेड्यामुखी वेद बोलविले गर्व द्विजांचे हरपिले शांती सूर्य प्रकाशला ॥२॥
निर्जीव भिंत चालविली हरली चांगदेवाची शक्ती मोक्ष मार्गाचा संगती ॥३॥
गीतेवरी निर्मिल्या टिका विठोबाचा प्राणसखा ॥४॥