उठाकी मनुबाई । झोप झाली की नाही । अजूनी तरी जागी होई । लागा सद्गुरुंच्या पायी । उठा की मनुबाई ॥धृ॥
दिले वावरा मोजूनी । जागा सोडतीने हात । जमीन चांगली आत बिज लाविले । सांभाळ म्हणुनी पुर्वी तुला बजाविले । ठेविले राखण तिथे पाच करकून । उठा कीं ॥१॥
वसूल घेऊनी मला हुजूरासी जाणे । यमाजीपंत तिथे वजाबाकी त्याना देणे । मग पाहसील तोंडाकडे मग करशील काय ॥२॥
रात्रं दिवस बहु केला व्यापारा । नफा कुठे सापडेना मग आपण गुढ होई ॥३॥
रात्रं दिवस बहू श्रमलिस तू फार । हिंडसी चहुकडे तुला सापडेना द्वार । सदगुरुला शरण जावे तोचि उद्धलीला पार । उठा की ॥४॥