चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला । भरजरी फाडूनी शेला चिंधी बांधिते ॥धृ॥
बघूनी तीचा तो भाव अलौकिक, मनी कृष्णाच्या दाट कौतुक कर पाठीवर पडला आपसुख प्रसन्न माधव झाला ॥१॥
हरी म्हणे ही माझी भगिनी भाऊ तुझा मी द्रुपदनंदिनी, साद घालीता येईन धावूनी प्रसंग जरी का पडला ॥२॥
प्रसंग कैसा येईल मजवर पाठीवरी अससी तू परमेश्वर बोले कृष्णा दाटूनी गहिवर । पूर लोचना आला ॥३॥