रुणुझुणु वाजवीत पैजणाचा ताल, हळूहळू चाल राधे हळूहळू चाल, गोरी गोरी कांती दिसे सुकुमार, नेसलीस चन्द्रकला भाळी कोर लाल । कुरळ्या या केसामध्ये केतकीचे पान ॥१॥
कुंडले ग कानामध्ये हिरे चमकती नेत्री तुझ्या काजळ हे शोभले किती । मुखी विडा रंगलाल ओठ लाल लाल ॥२॥
गोकुळात बांसरी वाजली हरी । बिगी बिगी चाल राधे पदर सावरी । जरी बुट्ट्याचा हा शालू रंग लाल ॥३॥