हरीचं प्रेम माझ्या हृदयात साठलं गं । मला भजनाला जावंसं वाटलं ग ।
कधी पाहीन विराट रूप, राम मारुती कौतुक वाटलं ॥१॥
पांघरूनी वैराग्याची शाल, शांतीची पैठणी लाल, कामक्रोधाचं पातळ फाटल ॥२॥
गुरुवारी दत्ताचे पूजन, शुक्रवारी अंबेला भोजन, पाय पोळीत मंदिर गाठलं ॥३॥
भक्तीवाचा नैवेद्य केला ज्ञानबोधाची साखर त्याला । पाणी गंगेच्या हृदयात साठलं ॥४॥
गुरुरायाने पूर्ण कृपा केली । मला पाहिजे तेज मला भेटलं ॥५॥