सुखालागी करीसी तळमळ । तरी पंढरीसी जाई एकवेळ । मग तू अवघासी सुखरूप होसी ॥धृ॥
जन्मोजन्मीचे चंद्रभागेसी करीतो एक स्नान तुझे दोष पळतील रानोरान ॥१॥
दुःख विसरीसी लोटांगण घालूनी महाद्वारी, कान धरोनी नाचावे गरुडापरी ॥२॥
नामा म्हणे काय द्यावी उपमा माझ्या विठ्ठलाची अलबला घ्यावी ॥३॥
मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दु:ख विसरसी ॥४॥