जय देवा जय देव जय नारायणा । आम्ही अपराधी मागतो क्षमा । नवखंड पृथ्वीवर तुझा प्रकाश । तेहतीस कोटी देव करीती अभ्यास । मी तू पणाचा होवू दे नाश । सर्व प्रजा तुझ्या चरणाचे दास । चारी नामाची आरती करिता । तल्लीन झाली माझी माया ममता । दु:खाच्या सागरी पडलो मी आता । तारी तारी मला जगदीश नाथा । श्रीकृष्ण म्हणे नवनीत माला दुधाचा नैवद्य चंद्र सूर्याला । अवघाची नवगुण मागे सारीला । नमस्कार माझा सूर्यनारायणाला । नमस्कार माझा बद्रिनारायणाला ॥