हृदयी वृंदावनी एक तुळशी बीज लाविले । स्नेह उदक घालूनिया । वाढविले तरुवरा तुळशीपत्र वाहते मी तुजसी शाम सुंदरा ॥धृ॥१॥
तुळशीपत्र तुळशी तुरे । तुळसी हार गुंफीले । भक्तीभावे तबकी भरुनी पावले मंदीरा ॥२॥
तुळशी माळाचे तुरे टवटवीत लटकती । तेची तुला आवडते प्रिय रुख्मीणीवरा ॥३॥
हिरवागार प्रेमेरंग रंगवी मनासी हा मधूर मधूर वास येई शांती देई अंतरा ॥४॥
पुजनासी अधीर बहूत झाले मी श्रीधरा । हित आस पुर्ण करी शरण शरण किंकरा ॥५॥