कार्तिक स्नान महिमान, नित्य करा गंगास्नान । राधाकृष्णाचे दर्शन आवळी भोजन करावे । उठूनीया प्रात:काळी । सडा समार्जन रांगोळी । नित्य आवळी पुजावी । दिवे देऊळी लावावे-उठा उठा हो सकळ झाला असे प्रात:काळ स्नान संध्येची ही वेळ गंगा तिरी तुम्ही जावे चला भागीरथीचे काठी स्नानाची महिमा मोठी । वाटूनी तिळ आवळ काठी ऊटी घ्यावी सर्वांगी । ऐशा विधीने स्नान करा अर्घ्य द्यावे दामोदरा चुकेल चौर्याशीचा फेरा राशी होतील पुण्याच्या । ऐकूनी रुक्मीणीच्या बोला, श्रीकृष्णाशी आनंद झाला आम्ही जाऊ चला तुम्ही करा तयारी । राधा जाऊनी घरोघरी म्हणे ऐकावे सुंदरी श्रीकृष्ण येतो बरोबरी जाऊ आवळी भोजना उठल्या नटल्या सर्व सुंदरी बांधोनी घेतली शिदोरी राधाकृष्ण बरोबरी वनांतरी चालल्या । गोपीकृष्ण मिळोनी जाती वनाची या हवा पाहती सभोवती यमुना वहती तेथे श्रीपती बैसले जाईजुई मधुमालती गुलाब गुलछबू शेवंती हार गुंफीती गळा घालती श्रीकृष्णाच्या आवळी नारळी पोकळी फणस पिकला असे तिथे पाट ताट रांगोळी वनमाळी तेथे बैसले । भाज्या कोशिंबीरी उसळी लाडू करंज्या आणी कडबोळी तारफेण्यावर गुरळी भजी पिवळी काढली । साल पापडी चिकवडी तेथे पानवडी वाढीली गवळी म्हणे हरीशी आणखी वाढीन दही वाढीन । सांजा सोजी दुध पोहे राधा वाढीत आहे हरी रुक्मीणीकडे पाहे । म्हणे आता बैसावे श्रीकृष्ण वाढीती परोपरीची पक्वान्ने । अशा रीतीने फराळ झाला । त्रयोदशी विडा दिला । मुखी हरिच्या रंगला । शेला पागोटे अहेर केला । हळदी कुंकू त्यादेती । रामकन्या विनवी कर जोडोनी । तुमचे चरणी राही माझी मती हेची मागणे मागते । चरणी ठाव देई आता ।