हिंग पुड्यांत बांधणार बहु तुका वाणी । वाण्याच्या वंशामध्ये तुकोबा ज्ञानी, यांनी संसारावरी सोडिले पाणी वाचीक नाम विठ्ठल केला धनी, तुकोबा सारिखा भक्तच नाही कोणी-दासीत निवडली नामयाची जनी । कुणब्यांत बोध राजानी केली पेरणी कसे कडेस लागले तुकोबाचे जहाज । शिंप्यांत शिर उभारले नामदेवाचे । कुणी उफवूनी घ्यागे वारे सुटले भक्तीचे । ज्याच्या दैवी असेल ते भजन करील रामाचे । माळ्यांत सांवता माळी असे जिवलगा । पोट चिरून दिधली विठ्ठलाशी जागा । एकनाथ स्वामींची ज्ञान अवघड गंगा । धर वाड्यामध्ये दाटता घनदाट । कोळ्यांत वाल्मीक हरी नामाचा घाट महारांत चोखा झाडी भक्तीची वाट । भक्तीने तरले आ हो दामाजीपंत । खांद्यावर कावड पाणी वाहे गंगेचे । गंध घासू लागले एकनाथ स्वामीचे । कुणी उफवूनी घ्या गे वारे सुटले भक्तिचे ॥