जन्माचे ते मूळ पाहिले शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा ॥१॥
पापपुण्य करोनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥२॥
रज, तम, सत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणे जगी वाया गेला ॥३॥
तम म्हणजे काय नर्कची केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥४॥
तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निंशी ॥५॥