मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत । डोळ्यात भरला ज्ञानोबा, मनात भरला तुकोबा, मुखात भरला विठोबा बाई ॥१॥
चंद्रभागेचे वाळवंट, तिथेच आमचे वैकुंठ भरला असे घनदाट ॥२॥
पंढरपुर दरबार, संत मिळाले अपार, हरी नामाचा गजर ॥३॥
पंढरपूर जाऊ या, गोपाळपुरा पाहू या, हंडीची लाही खाऊ या हो ॥४॥