जनी दळण काढी पांडुरंग जाते झाडी एका पाय घाली आढी, दूजा पाय घाली मोडी, आता जनीशी म्हणू काय उगीच बैसतील माय, असं म्हणूनी दळू बैसला गं ह्याचे नवल वाटते मला, काय म्हणावे राघवा तुला ह्याचे नवल वाटते मला ॥१॥
एकनाथाच्या घरी कावड घेऊनी खांद्यावरी आवडीने पाणी भरी, सांगा तुमी काम नका देऊ तुमी दाम, अस म्हनूनी कामी लागला त्याचे नवल वाटते मला ॥२॥
नामा शिंपी याच्या घरी न सांगता काम करी, आहे आपला हो हरी, निज सेवकाच्या परी त्याचा होऊनी हा दास, त्याचा होऊनी बंदीवास, गुरुराज महाराज असे म्हणूनी दळू लागला याचे नवल वाटते मला ॥३॥