गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पहावे तिकडे अवघे सर्व मायगोविंद । आनंदले विठोबा झाला माझे मनी, विटेसहित पाऊलेही देखिली लोचनी ॥१॥
न घडे तप साधन मुक्तीचे यास, जन्मो जन्मी गोड व्हावा भक्तीचा हा रस ॥२॥
तुका म्हणे आम्हा प्रेम उणे ते काही पंढरीराणा साठविला हृदयी ॥३॥