पंढरीच्या वाटेवरी अबीराची उधळण, भक्तीभाव सुमनांची गंधमय पखरण ॥धृ॥
आनंदले नदी नाले, आनंदली रानेवने, दारोदारी आतुरली स्वागतास निरांजने ॥१॥
भिडे उंच आभाळाला बोल रामकृष्ण हारी । धुंद टाळ धुंद मृदुंग धुंद झाली एकतारी ॥२॥
पालखीत विसावला योगिराज आंळदीचा, ज्ञानीयाचा ज्ञानदीप कल्पवृक्ष कल्पनांचा ॥३॥
हरीनाम कीर्तन रंगी वारकरी झाले दंग, भक्तांच्या या भेटी लागी, धाव घेई पांडुरंग ॥४॥