तुझ्या कान्हाच्या खोड्या किती गुंगुन जाई मती । धाकात ठेव ग जरा यशोदे असेल तुझा तो हिरा ॥धृ॥
घट घेऊन यमुनेला गेले, घट यमुनेच्या पाण्याने भरले, झपझप घराकडे आले, दारी येता घसरून पडले मातीचे घड गेले फुटून अन् माझ्या सासूने काढले कुटून ॥१॥
माझ्या घरी पळत पळत आला, अन् दह्या दुधाचा केला काला गोपी मित्रांना वाटून दिला, एक लोण्याचा गोळा उश्याशी ठेविला, सासूही मला काय म्हणेल ग सटवे चोरून खाणे का बरे ॥२॥
माझ्या वेणीला बांधून दोरे, गेली खुंटीला टांगून स्वारी, सकाळी उठता क्षणी. हिसकली माझी वेणी खुंटीही आली उरा, अन् माझ्या दातांचा झाला चुरा ॥३॥