मातला कली फार धरणी कापे थरथरा लोपले ज्ञान जगी । जन झाले गव्हार जन झाले जर्जर नेनती हीच खूण होतसे संहार । पाठीशी पांडुरंग रुक्मिणी सुंदर ।
श्री ज्ञानेश्वर माऊली पतिताला उद्धरी माय दिनाला उद्धरी ॥धृ॥
कार्तिकाचा महिमा फार जन येती अपार घेऊनी टाळ विणा नामाचा गजर नामाचा गजर । दिंडीवाले वारकरी होतसे हजर होतसे हजर । कांकड आरतीचा कर्णी वाजे कोसरी । घालूनी दहीदूध केशर कस्तुरी जळती नंदादीप दोही अंगी पुजारी । इंद्रायणीचे करूनी स्नान पुंडलिकाचे दर्शन, करीती गुप्तदान पापाचे खंडन । घालूनी प्रदक्षिणा स्वामीने दर्शन । घेऊनी माळ बुक्का उभी असे महाद्वारा ॥