सूरह - अत्तीन
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने ८)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
शपथ आहे अंजीर व जैतुनची, आणि तुर-ए-सीना आणि या शांततापूर्ण (मक्का) शहराची, आम्ही मानवाला उत्कृष्ट रचनेत निर्माण केले, मग उलट फिरवून आम्ही त्याला निकृष्टात निकृष्ट करून टाकले, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कृत्ये करीत राहिले की त्यांच्यासाठी कधी न संपणारा मोबदला आहे. तर (हे पैगंबर (स.)) यानंतर कोण मोबदला व शिक्षेच्या बाबतीत तुम्हाला खोटे ठरवू शकतो? काय अल्लाह सर्व शासकांपैक्षा मोठा शासक नाही? (१-८)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP