मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌मुल्क

सूरह - अल्‌मुल्क

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ३०)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.)

परम प्रतिष्ठित व उच्च आहे तो ज्याच्या हातात (सृष्टीची) सत्ता आहे आणि तो प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो. ज्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले जेणेकरून तुम्हा लोकांना अजमावून पहावे की तुमच्यापैकी कोण अधिक चांगले कृत्य करणारा आहे. आणि तो जबरदस्तही आहे आणि क्षमाशीलदेखील, ज्याने थरावर थर असे सात आकाश बनविले. तुम्हाला कृपावंताच्या निर्मितीत कोणत्याही प्रकारची विसंगती आढळणार नाही. पुन्हा वळून पहा, कोठे तुम्हाला काही उणीव दिसून येते का? पुन्हा पुन्हा दृष्टीक्षेप करा, तुमची दृष्टी थकून निराश परत येईल. (१-४)

आम्ही तुम्हास जवळ असलेल्या आकाशाला वैभवशाली दिव्यांनी सुशोभित केले, आणि त्यांना शैतानांना पिटाळून लावण्याची साधने बनविली आहेत. या शैतानांसाठी आम्ही भडकत असलेला अग्नी उपलब्ध करून ठेवला आहे. (५)

ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याशी द्रोह केला आहे त्यांच्यासाठी नरकाचा प्रकोप आहे आणि ते फारच वाईट ठिकाण आहे, जेव्हा ते त्यात फेकले जातील तेव्हा ते त्याच्या गर्जनेचा भयंकर आवाज ऐकतील, आणि तो उसळी घेत असेल, क्रोधाच्या तीब्रतेने तो बेभान होत असेल. प्रत्येक वेळी जेव्हा त्याच्यात एखादी झुंड फेकली जाईल, त्याचे कर्मचारी त्या लोकांना विचारतील, “तुमच्याजवळ कोणी सावध करणारा आलेला नव्हाता काय?” ते उत्तर देतील, “होय, सावध करणारा आमच्याजवळ आलेला होता, परंतु आम्ही त्याला खोटे ठरविले आणि सांगितले की अल्लाहने काहीही अवतरलेले नाही, तू मोठया पथभ्रष्टतेत पडला आहेस.” आणि ते म्हणतील, “अरेरे! जर आम्ही ऐकले असते अथवा समजून घेतले असते तर आज या भडकत्या अग्नीला पात्र असलेल्यात समाविष्ट नसतो.” अशाप्रकारे ते आपल्या अपराधाची स्वत: कबुली देतील. धिक्कार आहे या नरकवासियांवर. (६-११)

जे लोक न पाहता आपल्या पालनकर्त्याला भितात, खचितच त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि मोठा मोबदला. तुम्ही मग हळूच बोला अथवा मोठया आवाजांत (अल्लाहसाठी एकसारखे आहे) तो तर मनाच्या स्थितीलादेखील जाणतो. काय तो जाणणार नाही ज्याने निर्माण केले आहे वस्तुत: तो सूक्ष्मदर्शी आणि खबर ठेवणारा आहे. (१२-१४)

तोचतर आहे ज्याने तुमच्यासाठी पृथ्वीला अधीनस्थ करून ठेवले आहे, तिच्यावर संचार करा आणि खा अल्लाहची उपजीविका, त्याच्याच पुढे तुम्हाला पुन्हा जिवंत होऊन जावयाचे आहे. काय तुम्ही यापासून निर्भय आहात की तो जो आकाशात आहे, त्याने तुम्हाला जमिनीत खचवावे आणि अकस्मात ही पृथ्वी कंप पावू लागावी? काय तुम्ही यापासून निर्भय आहात की तो जो आकाशांत आहे तो तुम्हावर दगडांचा मारा करणारे वारे पाठवील? मग तुम्हाला कळेल की माझी धमकी कशी असते. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेले लोक खोटे ठरवून चुकले आहेत, मग पाहून घ्या की माझी पकड कशी कठोर होती. काय हे लोक आपल्यावरून उडणार्‍या पक्षांना पंख पसरताना व आखडताना पाहत नाहीत? कृपावंताशिवाय अन्य कोणी नाही की ज्याने त्यांना तोलून धरले असेल, तोच प्रत्येक वस्तूची काळजी घेणारा आहे. दाखवा, बरे ते कोणते सैन्य आहे तुमच्याजवळ जे कृपावंताच्या मुकाबल्यात तुम्हाला महाय्य करू शकेल? वस्तुस्थिती अशी आहे की हे इन्कार करणारे फसवणुकीत सापडले आहेत. अथवा सांगा कोण आहे जो तुम्हाला उपजीविका देऊ शकतो जर कृपावंताने आपली उपजीविका रोखून धरली? वस्तुत: हे लोक शिरजोरी आणि सत्यापासून विमुख राहण्यावर अडून बसले आहेत. बरे विचार करा जो इसम तोंड खाली घालून चालत असेल तो अधिक सरळमार्ग प्राप्त करणारा आहे अथवा तो जो डोके वर करून सरळ एका समतल मार्गावर चालत असेल? यांना सांगा, अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले. तुम्हाला ऐकण्या व पाहण्याच्या शक्ती दिल्या आणि समजउमज बाळगणारी मने दिली, परंतु तुम्ही कमीच कृतज्ञता  दाखविता. (१५-२३)

यांना सांगा, अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला पृथ्वीवर फैलावले आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही एकत्रित केले जाल. हे म्हणतात, “जर तुम्ही खरे असाल तर सांगा हे वचन केव्हा पूर्ण होईल?” सांगा, “याचे ज्ञान तर अल्लाहपाशी आहे, मी तर केवळ स्पष्टपणे सावध करणारा आहे.” मग जेव्हा हे त्या गोष्टीला जवळ पाहतील तेव्हा त्या सर्व लोकांचे चेहरे बिघडतील ज्यांनी इन्कार केला आहे आणि त्यावेळी त्यांना सांगण्यात येईल आणि त्यावेळी त्यांना सांगण्यात येईल की हीच आहे ती गोष्ट जिचा तगादा तुम्ही करीत होता. (२४-२७)

यांना सांगा, कधी तुम्ही असाही विचार केला की अल्लाह हवे तर मला व माझ्या साथीदारांना नष्ट करो अथवा आमच्यावर दया करो, अश्रद्धावंतांना यातनादायक प्रकोपापासून कोण वाचनादायक प्रकोपापासून कोण वाचवीतल? यांना सांगा, तो मोठा दयाळू आहे, त्याच्यावरच आम्ही श्रद्धा ठेवली आहे आणि त्याच्यावरच आमचा विश्वास आहे, लवकरच तुम्हाला कळेल की स्पष्ट पथभ्रष्टतेत कोण पडलेला आहे. यांना सांगा, कधी तुम्ही असाही विचार केला की जर तुमच्या विहिरीचे पाणी जमिनीत उतरले तर कोण आहे जो या वाहणार्‍या पाण्य़ाचे स्रोत तुम्हाला काढून देईल? (२८-३०)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP