(मदीनाकालीन, वचने २२)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
अल्लाहने ऐकले त्या स्त्रीचे म्हणणे जी आपल्या पतीसंबंधी तुमच्याशी तक्रार करीत आहे आणि अल्लाहकडे फिर्याद करीत आहे. अल्लाह तुम्हा दोघांचे संभाषण ऐकत आहे, तो सर्वकाही ऐकणारा व पाहणारा आहे. तुमच्यापैकी जे लोक आपल्या पत्नीशी ‘जिहार’ करतात त्यांच्या पत्नीं त्यांच्या माता नव्हेत, त्यांच्या माता तर त्याच होत ज्यांनी त्यांना जन्म दिले आहे. हे लोक एक अत्यंत अप्रिय आणि खोटी गोष्ट बोलत आहेत, आणि वास्तविकता अशी आहे की अल्लाह मोठा माफ करणारा व क्षमाशील आहे. (१-२)
हे लोक आपल्या पत्नींशी ‘जिहार’ करतील आणि मग त्या आपल्या शब्दापासून परत फिरतील जे त्यांनी उच्चारले होते, तर यापूर्वी की उभयतांनी एकमेकांस स्पर्श करावे, एक गुलाम मुक्त करावा लोगल. याद्वारे तुम्हाला उपदेश केला जात आहे, आणि जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची खबर राखणारा आहे. आणि ज्या व्यक्तीला गुलाम उपलब्ध होत नसेल त्याने त्याने दोन महिने निरंतर उपवास करावेत यापूर्वी की उभयतांनी एकमेकांस स्पर्श करावा. आणि ज्याला हे सामर्थ्यही नसेल त्याने साठ गरिबांना जेवण घालावे. ही आज्ञा अशासाठी दिली जात आहे की तुम्ही अल्लाह व त्याच्या पैगंबरावर श्रद्धा ठेवावी. या अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादा होत आणि अश्रद्धावंतांसाठी यातनादायक शिक्षा आहे. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करतात ते त्याचप्रकारे अपमानित व फटफजित केले जातील ज्याप्रकारे त्यांच्या पूर्वीचे लोक अपमानित व फटफजित केले गेले आहेत. आम्ही अगदी स्पष्ट वचने अवतरली आहेत, आणि इन्कार करणार्यांसाठी अपमानाचा प्रकोप आहे. त्यादिवशी (हा अपमानास्पद प्रकोप होणार आहे) जेव्हा अल्लाह त्या सर्वांना पुन्हा जिवंत करून उठवील आणि त्यांना दाखवील की ते काय काय करून आलेले आहेत. ते विसरले आहेत परंतु अल्लाहने त्यांचे सर्व केले सवरलेले मोजून सुरक्षित केले आहे, आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीवर साक्षी आहे. (३-६)
काय तुम्हाला माहीत नाही की पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक वस्तूचे अल्लाहला ज्ञान आहे? असे कधीही घडत नाही की तीन माणसांमध्ये एखादी कानगोष्ट होते आणि त्यांच्या दरम्यान चौथा अल्लाह नसतो अथवा पाच माणसांमध्ये कानगोष्ट होते आणि त्यांच्या दरम्यान सहावा अल्लाह नसतो. गुप्त गोष्ट करणारे मग ते यापेक्षा कमी असोत किंवा जास्त, जेथे कोठे ते असतील अल्लाह त्यांच्या समवेत असतो. मग पुनरुत्थानाच्या दिवशी तो त्यांना दाखवून देईल की त्यांनी काय काय केलेले आहे. अल्लाह सर्व वस्तूंचे ज्ञान राखतो. काय तुम्ही पाहिले नाही त्या लोकांना ज्यांना कानगोष्टी करण्याची मनाई केली गेली होती, तरीसुद्धा ते तेच कृत्य करीत जात आहेत, ज्याची त्यांना मनाई केली गेली होती? हे लोक लपून छपून आपापसांत गुन्हा आणि आगळिकी व पैगंबरांच्या अवज्ञेच्या गोष्टी करतात. आणि जेव्हा तुमच्याजवळ येतात तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीने सलाम करतात ज्या पद्धतीने अल्लाहने तुम्हाला सलाम केलेले नाही. आणि आपल्या मनात म्हणतात, की आमच्या या गोष्टीवर अल्लाह आम्हाला यातना का देत नाही? त्यांच्यासाठी नरकच पुरेसा आहे. तिचेच ते इंधन बनतील, फारच वाईट शेवट आहे त्यांचा. (७-८)
हे लोकाहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, जेव्हा तुम्ही आपापसात गुप्त गोष्ट कराल तेव्हा पाप. आणि आगळीक व पैगंबरांच्या अवज्ञेच्या गोष्टी नव्हे तर सदाचार आणि ईशपरायणतेच्या गोष्टी करा आणि त्या अल्लाहच्या कोपचे भय बाळगत रहा ज्याच्या पुढे तुम्हाला एकत्र हजर व्हावयाचे आहे. कानगोष्टी तर एक शैतानी कृत्य आहे आणि त्या यासाठी केल्या जातात खी श्रद्धा ठेवणारे लोक त्यामुळे दु:खी व्हावेत. वस्तुत: अल्लाह्च्या आज्ञेविना त्या त्यांना काहीही हानी पोहचवू शकत नाहीत आणि श्रद्धावंतांनी अल्लाहवरच भिस्त ठेवली पाहिजे. (९-१०)
हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, जेव्हा तुम्हाला सांगितले जाईल की आपल्या बैठकींमध्ये विस्तार आणा तेव्हा जागा विस्तृत करीत जा, अल्लाह तुम्हाला विस्मृतता प्रदान करील आणि जेव्हा तुम्हाला सांगितले जाईल की उठा, तेव्हा उठत जा. तुम्हापैकी जे लोक श्रद्धावंत आहेत आणि ज्यांना ज्ञान प्रदान केले गेले आहे-अल्लाह त्यांना उच्च दर्जे प्रदान करील आणि जे काही तुम्ही करता: अल्लाहला त्याची खबर आहे. (११)
हे लोकहो ज्यानी श्रद्धा ठेवली आहे. जेव्हा तुम्ही पैगंबरांशी एकांतात बोलाल तेव्हा बोलण्यापूर्वी काही दान करा, हे तुमच्यासाठी उत्तम आणि अधिक पवित्र आहे परंतु जर दान करण्यासाठी काही उपलब्ध होत नसेल तर अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे. (१२)
काय तुम्ही या गोष्टीने भयभीत झालात की एकांतात बोलणी करण्यापूर्वी तुम्हाला दान करावे लागेल? बरे, जर तुम्ही असे केले नाही-आणि अल्लाहने तुम्हाला हे माफ केले-तर नमाज कायम करीत रहा, जकात देत रहा आणि अल्लाह व त्याच्या पैगंबरांची आज्ञा पाळीत रहा, तुम्ही जे काही करता अल्लाह त्याची खबर राखणारा आहे. (१३)
काय तुम्ही पाहिले नाही त्या लोकांना ज्यांनी मित्र बनविले आहे एका अशा लोकसमूहाला ज्यावर अल्लाहचा कोप आहे? ते तुमचेही नाहीत आणि त्यांचेही नाहीत, आणि ते जाणूनबुजून खोटया गोष्टींवर शपथा घेतात. अल्लाहने त्यांच्यासाठी भयंकर यातना उपलब्ध करून ठेवल्या आहेत, फारच वाईट कृत्ये आहेत ती जे ते करीत आहेत. त्यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून टाकले आहे ज्यांचा आडोसा घेरून ते अल्लाहपासून वाचविण्यासाठी त्यांची मालमत्ताही काही उपयोगी पडणार नाही की त्यांची संतती. ते नरकाचे सोबती आहेत, त्यातच ते सदैव राहतील. ज्या दिवशी अल्लाह त्यासर्वांना उठवील, ते त्याच्यासमोर तशाच शपथा घेतील जशा ते तुमच्यासमोर घेतात आणि ते आपल्याठायी असे समजतील की याच्याने त्यांचे काही काम साधेल, चांगले समजून असा, ते पराकोटीचे लबाड आहेत. शैतान त्यांच्यावर स्वार झालेला आहे आणि त्याने त्यांच्या मनातून अल्लाहच्या स्मरणाचा विसर पाडला आहे. ते शैतानाच्या पार्टीचे लोक होत. सावध रहा. शैतानाच्या पार्टीचेच लोक तोटयात राहणारे आहेत. निश्चितच नीचतम लोकांपैकी आहेत ते लोक जे अल्लाह व त्याच्या पैगंबराचा मुकाबला करतात. अल्लाहने लिहून टाकले आहे की मी आणि माझे प्रेषितच वरचढ ठरू, खरोखरच अल्लाह जबरद्स्त आणि बलवान आहे. (१४-२१)
तुम्हाला असे कधीही आढळणार नाही की जे लोक अल्लाह आणि मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवणारे आहेत ते त्या लोकांवर प्रेम करीत असतील ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध केला आहे, मग ते त्यांचे वडील असोत अथवा त्यांचे पुत्र, किंवा त्यांचे भाऊ अथवा त्यांची कुटुंबीय मंडळी, हे ते लोक होत ज्यांच्या ह्रदयात अल्लाहने श्रद्धा दृढ केली आहे आणि आपल्याकडून एक आत्मा प्रदान करून त्यांना शक्ती प्रदान केली आहे. तो त्यांना अशा स्वर्गामध्ये दाखल करील ज्यांच्याखालून कालवे वाहत असतील. त्यांच्यात ते सदैव राहतील. अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि ते अल्लाहशी खुश झाले. ते अल्लाहच्या पार्टीचे लोक आहेत. सावधान, अल्लाहच्या पार्टीचेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत. (२२)