मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
मुहम्मद

सूरह - मुहम्मद

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मदीनाकालीन, वचने ३८)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

ज्या लोकांनी द्रोह केला आणि अल्लाहच्या. मार्गापासून रोखले, अल्लाहने त्यांची कृत्ये वाया घालविली व ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी सत्कृत्ये केली आणि ती गोष्ट मान्य केली जी मुहम्मद (स.) वर अवतरली आहे, आणि ती पूर्णत: सत्य आहे त्यांच्या पालनकर्त्याकडून, अल्लाहने त्यांच्या वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर केल्या आणि त्यांची स्थिती सुधारली. हे अशासाठी की द्रोह करणार्‍यांनी असत्याचे अनुसरण केले आणि श्रद्धा ठेवणार्‍यांनी त्या सत्याचे सनुसरण केले जे त्यांच्या पालनकर्त्याकडून आलेले आहे. अशा तर्‍हेने अल्लाह लोकांना त्यांची वास्तविक योग्यता दाखवून देत आहे. (१-३)

म्हणून जेव्हा या अश्रद्धावंतांशी तुमचा सामना होईल तेव्हा पहिले काम मानेवर प्रहार करणे आणि जेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ठेचून काढाल तेव्हा त्यांना बांधून ठेवा. नंतरज त्यांच्यावर अनुग्रह करा किंवा खंडणी घ्या, इथपर्यंत की ते शरण येतील. हे आहे तुम्ही करावयाचे काम. अल्लाहने इच्छिले असते तर स्वत:च त्यांच्याशी निपटले असते, परंतु (ही पद्धत त्याने अशासाठी स्वीकारली आहे) जेणेकरून तुम्हा लोकांना एक दुसर्‍याच्या द्वारे अजमवावे. आणि जे लोक अल्लाहच्या मार्गात मारले जातील,
अल्लाह त्यांच्या कृत्यांना कदापि वाया जाऊ देणार नाही. तो त्यांचे मार्गदर्शन करील, त्यांची स्थिती सुधारेल, आणि त्यांनी त्या स्वर्गामध्ये दाखलकरील जिच्याशी त्याने त्यांना परिचित केले आहे. (४-६)

हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे! जर तुम्ही अल्लाहला सहाय्य कराल तर तो तुम्हाला सहाय्य करील आणि तुमचे पाय मजबूतीने दृढ करील. उरले ते लोक ज्यांनी द्रोह केला आहे तर त्यांच्यासाठी विनाश आहे आणि अल्लाहने त्यांच्या कृत्यांना भटकविले आहे, कारण त्यांनी त्या गोष्टीला नापसंत केले ज्याला अल्लाहने अवतरले आहे, म्हणून अल्लाहने त्यांची कृत्ये वाया घालविली. काय ते भूतलावर वावरले नव्हते की त्यांनी त्या लोकांना शेवट पाहिला जे त्यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत? अल्लाहने त्यांचे सर्व काही त्यांच्यावर उलटविले आणि असलेच परिणाम या अश्रद्धावंतांसाठी नियोजित आहेत. हे अशासाठी की श्रद्धावंतांचा वाली व सहायक अल्लाह आहे आणि अश्रद्धावंतांचा वाली व सहायक कोणीही नाही. श्रद्धावंतांना व सत्कृत्ये करणार्‍यांना अल्लाह त्या स्वर्गात दाखल करील ज्यांच्याखाली कालवे वाहतात, आणि द्रोह करणारे बस्स, जगाच्या क्षणभंगुर जीवनाचा आनंद लुटत आहेत. चतुष्पादाप्रमाणे खात-पीत आहेत आणि त्यांचे अखेरचे स्थान नरक आहे. (७-१२)

हे पैगंबर (स.), कित्येक वस्त्या अशा होऊन गेल्या आहेत ज्या तुमच्या त्या वस्तीपेक्षा फारच बलवान होत्या जिने तुम्हाला काढून टाकले आहे, त्यांना आम्ही अशाप्राकारे नष्ट केले की कोणीच त्यांना वाचविणारा नव्हता. बरे कधी असे होऊ शकेल की जो आपल्या पालनकर्त्याकडून एक स्वच्छ व स्पष्ट मार्गदर्शनावर असेल, तो त्या लोकांप्रमाणे बनेल ज्यांच्यासाठी त्यांचे वाईट कृत्या विलोभनीय बनविलेले आहे आणि ते आपल्या वासनेचे अनुयायी बनलेले आहेत. ईशपरायण लोकांसाठी ज्या स्वर्गाचे वचन दिले गेले आहे त्याचे वैभव तर असे आहे की त्यात कालवे वाहत असतील निवळलेल्या पाण्याचे, अशा दुधाचे ज्याच्या चवीत यत्किंचितसुद्धा फरक आलेला नसेल. अशा पेयांचे जे पिणार्‍यांसाठी स्वादिष्ट असेल. कालवे वाहत असतील स्वच्छ व शुद्ध मधाचे. त्यात त्यांच्यासाठी हर प्रकारची फळे असतील आणि त्यांच्या पालनकर्त्याकडून क्षमादान (काय तो मनुष्य ज्याच्या वाटयाला हा स्वर्ग येणार आहे) त्या लोकांसमान होऊ शकतो जे नरकामध्ये सदैव राहतील आणि ज्यांना असले गरम पाणी पाजले जाईल जे त्यांचे आंतडेसुद्धा कापून टाकील? (१३-१५)

यांच्यापैकी काही लोक असे आहेत जे कान लावून तुमचे म्हणणे ऐकतात आणि मग जेव्हा तुमच्या जवळून निघतात तेव्हा त्या लोकांना ज्यांना ज्ञानाची देणगी प्रदान केली गेली आहे, विचारतात की आता इतक्यात यानी काय सांगितले होते? हे ते लोक आहेत ज्यांच्या ह्रदयावर अल्लाहने मोहर लावून टाकली आहे आणि हे आपल्या वासनांचे अनुयायी बनले आहेत. उरले ते लोक ज्यांना मार्गदर्शन प्राप्त झाले आहे, अल्लाह त्यांना आणखी जास्त मार्गदर्शन देतो आणि त्यांना त्यांच्या हिश्याची ईशपराणता प्रदान करतो. आता काय हे लोक बस्स पुनरुत्थानाच्याच प्रतीक्षेत आहेत की ते अकस्मात यांच्यावर यावे? त्याची चिन्हे तर आलेली आहेत. जेव्हा ते प्रत्यक्ष येईल तेव्हा यांच्यासाठी उपदेश स्वीकारण्याची कोणती संधी बाकी उरेल? (१६-१८)

तर हे पैगंबर (स.), चांगल्या प्रकारे जाणून असा की अल्लाहशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही, आणि क्षमायाचना करा आपल्या चुकांसाठीसुद्धा आणि श्रद्धावंत पुरुष व स्त्रियांसाठीसुद्धा. अल्लाह तुम्ही जिथे वावरता आणि जिथे राहता ती ठिकाणे जाणतो. (१९)

ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे ते म्हणत होते की एखादी सूरत का उतरविली जात नाहीज (जिच्यात युद्धाचा हुकूम दिला जावा.) परंतु जेव्हा एक परिपक्व सूरत अवतरली गेली जिच्यात युद्धाचा उल्लेख होता तेव्हा तुम्ही पाहिले की ज्यांच्या ह्र्दयांना रोग जडलेला होता ते तुमच्याकडे अशाप्रकारे पाहात आहेत जणू एखाद्यावर मृत्यू पसरला होता. खेद आहे त्यांच्या दशेवर. (त्यांच्या जिभेवर आहे) आज्ञाधारकतेचा स्वीकार आणि चांगल्या चांगल्या गोष्टी परंतु जेव्हा निर्णायक हुकूम दिला गेला तेव्हा ते अल्लाहशी आपल्या वचनांत खरे उतरले असते तर त्यांच्यासाठी चांगले होते. आता काय तुम्हा लोकांकडून याशिवाय अन्य काही अपेक्षा केली जाऊ शकते की जर तुम्ही उलट तोंड फिरविले तर भूतलावर पुन्हा उपद्रव माजवाल आणि आपापसात एकमेकांचे गळे कापाल? हे लोक आहेत ज्यांचा अल्लाहने धिक्कार केला आणि त्यांना आंधळे व बहिरे करून टाकले. काय या लोकांनी कुरआनवर विचार केला नाही, अथवा ह्रदयांवर त्यांच्या कुलुपे लागलेली आहेत?.
वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक मार्गदर्शन स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यापासून पराङमुख झाले; त्यांच्यासाठी शैतानानने या वर्तनाला सुलभ बनविले आहे आणि खोटया अपेक्षांची मालिका त्यांच्यासाठी दीर्घ केलेली आहे. म्हणूनच त्यांनी अल्लाहने अवतरलेल्या धर्माला नापसंत करणार्‍यांना सांगून टाकले की काही बाबतीत आम्ही तुमचे मान्य करू. अल्लाह त्यांच्या या गुप्त गोष्टी चांगल्या प्रकारे जाणतो. मग त्यावेळी काय दशा होईल जेव्हा दूत यांचे प्राण हरण करतील आणि यांच्या तोंडावर व पाठीवर मारत यांना नेतील? हे या कारणास्तव होईल की यांनी त्या पद्धतीचे अनुसरण केली जी अल्लाहला नाराज करणारी आहे आणि त्याच्या प्रसन्नतेचा मार्ग अवलंबिणे पसंत केले नाही, यापायीच त्याने यांची सर्व कृत्ये वाया घालविली. (२०-२८)

काय ते लोक ज्यांच्या ह्रदयांत रोग आहे: असे समजून बसले आहेत की अल्लाह त्यांच्या ह्रदयांतील दोष उघड करणार नाही? आम्ही इच्छिले तर तुम्हाला ते डोळ्यांनी दाखवू आणि त्यांच्या चेहर्‍यावरून तुम्ही त्यांना ओळखून घ्याल परंतु त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून तर तुम्ही त्यांना ओळखून घ्यालच. अल्लाह तुम्हा सर्वांच्या कृत्याशी चांगला परिचित आहे. आम्ही जरूर तुम्हा लोकांना कसोटीत घालू जेणेकरून तुमच्या स्थितीचे परीक्षण करू आणि पाहू की तुमच्यात ‘मुजाहिद’ (प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा) आणि दृढतेने अढळ राहणारा कोण आहे. (२९-३१)

जो लोकांनी द्रोह केला आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखले व पैगंबराबरोबर भांडण केले. जेव्हा की त्यांच्यावर सरळमार्ग स्पष्ट झाला होता, वस्तुत: ते अल्लाहची कोणतीही हानी करू शकत नाहीत तर अल्लाहच त्यांचे सर्व केले सवरलेले नष्ट करील. हे श्रद्धावंतांनो, तुम्ही अल्ल्लाह्चे आज्ञापालन करा आणि पैगंबराचे आज्ञापालन करा आणि आपल्या सत्कृत्यांना नष्ट करून घेऊ नका. द्रोह करणार्‍यांना आणि मरेपर्यंत द्रोहावर दृढ राहणार्‍यांना तर अल्लाह कदापि माफ करणार नाही. म्हणून तुम्ही भ्याड बनू नका आणि तहाची विनंती करू नका. तुम्हीच वरचढ ठरणार आहात. अल्लाह तुमच्यासमवेत आहे आणि तुमच्या कृत्यांना तो कदापि वाया घालविणार नाही. हे ऐहिक जीवन तर एक खेळ आणि तमाशा आहे. जर तुम्ही श्रद्धा ठेवता आणि ईशपराणांचा मार्ग अनुसरत राहिला तर अल्लाह तुमचा मोबदला तुम्हाला देईल आणि तो तुमची मालमला तुमच्याकडून मागणार नाही. जर एखादे वेळी त्याने तुमची मालमत्ता तुमच्याकडून इच्छिली आणि सर्वच्या सर्व तुमच्याकडून मागून घेतली तर तुम्ही कंजूषपणा दाखवाल आणि तो तुमची चूक बाहेर आणील. पहा. तुम्हा लोकांना आवाहन केले जात आहे की अल्लाहच्या मार्गात माल खर्च करा. यावर तुमच्यापैकी काहीजण आहेत जे कंजूषपणा करीत आहेत, वास्तविकपणे जो कंजूषपणा करतो तो खरे पाहता आपल्या स्वत:शीच कंजूषपणा करीत आहे. अल्लाह तर निरपेक्ष आहे, तुम्हीच त्याचे गरजवंत आहात,
जर तुम्ही तोंड फिरवाल तर अल्लाह तुमच्या जागी अन्य एखाद्या जनसमुदायाला आणील आणि ते तुमच्यासारखे असणार नाही. (३२-३८)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP