सूरह - अल्इन्शिकाक
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने २५)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
जेव्हा आकाश फाटून जाईल आणि आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करील व त्याच्यासाठी सत्य हेच आहे (की आपल्या पालनकर्त्याची आज्ञा पाळावी) आणि जेव्हा पृथ्वी पसरविली जाईल आणि जे काही तिच्यात आहे त्याला बाहेर फेकून रिकामी होईल. आणि आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करील व तिच्यासाठी सत्य हेच आहे की (त्याची अंमलबजावणी करावी) हे मानवा, तू खेचला जाऊन आपल्या पालनकर्त्याकडे वाटचाल करीत आहेस आणि त्याला भेटणार आहेस. मग ज्याची कर्मनोंद त्याच्या उजव्या हातात दिली जाईल. त्याच्याकडून सौम्य हिशोब घेतला जाईल. आणि तो आपल्या माणसांकडे आनंदाने परतेल. आता उरला तो इसम ज्याची कर्मनोंद त्याच्या पाठीमागून दिली जाईल. तर तो आपल्या मृत्यूला हांक देईल आणि भडकणार्या आगीत जाऊन पडेल. तो आपल्या कुटुंबियांत मग्न होता. त्याची समजूत होती की त्याला कधी परतावयाचे नाही. परतणे कसे नव्हते, त्याचा पालनकर्ता त्याची दुष्कृत्य पहात होता. (१-१५)
तर नव्हे मी शपथ घेतो संध्या-लालीमाची, आणि रात्रीची व जे काही ती समेटून घेते आणि चंद्राची जेव्हा तो पूर्णचंद्र बनतो, तुम्हाला जरूर क्रमाक्रमाने एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेकडे वाटचाल करीत रहावयाचे आहे. मग लोकांना काय झाले आहे की हे श्रद्धा ठेवीत नाहीत. आणि जेव्हा कुरआनचे त्यांच्या समोर पठण केले जाते तेव्हा नतमस्तक होत नाहीत? किंबहुना हे इन्कार करणारे तर उलट खोटे ठरवितात. वस्तुत: जे काही हे (आपल्या कर्मनोंदीत) जमा करीत आहेत, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. म्हणून यांना यातनादायक प्रकोपाची खुशखबरी द्या. तथापि ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आहे आणि ज्यांनी सत्कृत्ये केली आहेत त्यांच्यासाठी कधी न संपणारा मोबदला आहे. (१६-२५)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP