मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अत्‌तकवीर

सूरह - अत्‌तकवीर

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने २९)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

जेव्हा सूर्य गुंडाळून टाकला जाईल आणि जेव्हा तारे निखळून पडलीत, आणि जेव्हा पर्वत चालविले जातील आणि जेव्हा दहा महिन्यांच्या गाभण उंटिणी आपल्या द्शेत सोडून दिल्या जातील. आणि जेव्हा वन्य पशू समेटून एकत्र केले जातील आणि जेव्हा समुद्र भडकविले जातील आणि जेव्हा प्राण (शरीराशी) जोडले जातील. आणि जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली? आणि जेव्हा कर्मनोंदी उघडल्या जातील आणि जेव्हा आकाशाचा पडदा दूर केला जाईल आणि जेव्हा नरक भडकविले जाईल आणि जेव्हा स्वर्ग जवळ आणला जाईल त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे. (१२-१४)

नव्हे मी शपथ घेतो परतणार्‍या व लपणार्‍या तार्‍याची आणि रात्रीची जेव्हा ती निरोप घेते आणि सकाळची जेव्हा ती श्वास घेते, हे प्रत्यक्षात एका प्रतिष्ठित संदेशवाहकाचे कथन आहे जो मोठी शक्ती बाळगतो, राजसिंहासन-वाल्यापाशी उच्चपदस्थ आहे. तेथे त्याची आज्ञा मानली जाते. तो विश्वसनीय आहे. आणि (हे मक्कावासियांनो) तुमचा मित्र वेडा नाही. त्याने त्या संदेशवाहकाला उजळ क्षितिजावर पाहिले आहे आणि तो परोक्ष (च्या या ज्ञानाला लोकांपर्यंत पोहचविण्याच्या) बाबतीत कंजुष नाही. आणि हे कोणा धिक्कारलेल्या शैतानाचे कथन नाही. मग तुम्ही लोक कुणीकडे भरकटत आहात? हा तर सकल जगवासियांसाठी एक उपदेश आहे. तुमच्यापैकी त्या प्रत्येक माणसासाठी जो सरळ मार्गावर चालू इच्छित असेल. आणि तुमच्या इच्छिण्याने काहीही होत नाही जोपर्यंत सर्व जगांचा पालनकर्ता अल्लाह इच्छित नाही. (१५-२९)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP