सूरह - अल्गाशिया
कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.
(मक्काकालीन, वचने २६)
अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.
काय तुम्हाला त्या व्यापून टाकणार्या आपत्ती (म्हणजे पुनरुत्थानाची) खबर पोहचली आहे? काही चेहरे त्या दिवशी भयभीत असतील, कठोर परिश्रम करीत असतील. थकून जात असतील. तीव्र आगीत होरपळून निघत असतील. उकळत्या झर्याचे पाणी त्यांना पिण्यास दिले जाईल. काटेरी वाळलेल्या गवताशिवाय कोणतेही भोजन त्यांच्यासाठी असणार नाही जे ना पुष्ट करील, जे ना भूक शमवील. काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लीत असतील. आपल्या कामगिरीवर आनंदीत असतील, उच्चकोटीच्या स्वर्गामध्ये असतील. कोणतीही वाह्यात गोष्ट ते तेथे ऐकणार नाहीत. त्यात झरे प्रवाहित असतील, त्याच्यात उच्च आसने असतील, पेले ठेवलेले असतील, लोडांच्या रांगा लावलेल्या असतील, आणि उत्कृष्ट बिछाने अंथरलेले असतील. (१-१६)
(हे लोक मानीत नाहीत) तर काय हे उंटांना पाहात नाहीत की कसे बनविले गेलेत? आकाशाला पहात नाहीत की कसे उभारले गेले? पर्वतांना पहात नाहीत की कसे दृढ केले गेलेत? आणि पृथ्वीला पहात नाहीत की कशी अंथरली गेली? (१७-२०)
बरे तर (हे पैगंबर (स.)), उपदेश करीत रहा, तुम्ही केवळ उपदेशच करणारे आहात, यांच्यावर जबरदस्ती करणारे नाहीत. तथापि जो इसम विमुख होईल आणि इन्कार करील तर अल्लाह त्याला भारी शिक्षा देईल. या लोकांना परतावयाचे आमच्याकडे आहे, मग त्यांचा हिशोब घेणे आमच्याकडेच आहे. (२१-२६)
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2013
TOP