मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अलम्‌ नश्‌राह

सूरह - अलम्‌ नश्‌राह

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ८)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

(हे पैगंबर (स.) ) काय आम्ही तुमचे मन तुमच्यासाठी उघडले नाही? आणि तुमच्यावरून ते भारी ओझे उतरविले जे तुमची कंबर खचवीत होते. आणि तुमच्याखातर तुमच्या लौकिकाचा नाद दुमदुमला. तर वस्तुस्थिती अशी आहे की, अडचणीबरोबर संपन्नताही आहे. नि:संशय अडचणीबरोबर संपन्नताही आहे. म्हणून जेव्हा तुम्ही मोकळे व्हाल तेव्हा उपासनेच्या परिश्रमात लागा आणि आपल्या पालनकर्त्याकडेच ओढ ठेवा. (१-८)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP