Dictionaries | References

शिर

   
Script: Devanagari

शिर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the head of. See 1 Sam. xxviii. 2. Ex. शिरीं असतां पंढरीनाथ ॥ चिंता किमपि न करावी ॥.
śira ind The sound uttered in driving off a cat.

शिर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The head. The top of a tree. The van of an army.
शिर सुरी तुझ्या हाती   (My, &c.) life awaits your disposal.
शिर हातांवर घेणें.   Take one's head in one's hand; be reckless of life.
शिरीं   On the head of, i.e. at the very moment of. Ex.
प्रसंगाच्या शिरीं. शिरी असणें   Be at or over the head of.

शिर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कपाळ, मस्तक, डोके

शिर     

 न. १ डोकें ; माथा ; मस्तक ; शीर्ष . तीन शिरें , सहा हात । तया माझें दंडवत । २ झाडाचा माथा , शेंडा ; टोंक . ३ सैन्याची आघाडी ; बिनी . ४ डोई ; व्यक्ति ; घोडयांची संख्या मोजतांना वापरतात . उदा० घोडा शिर चार = चार घोडे [ सं . शिरस् ‍ ; फा . सर ] म्ह० १ शिरसलामत तो पगडया पंचवीस - जोंपर्यंत शरीरांत प्राण आहे , तोंपर्यंत बाह्य शृंगार वाटेल तसा करता येईल ( ल . ) मूळ कायम अंसलें म्हणजे बाकीच्या गोष्टी मिळतात . २ शिर सुरी तुझ्या हातीं = तुझ्यां हातीं माझा प्राण दिला आहे मारणें तारणें सर्व तुझ्या इच्छेवर .
उद्गा . शुकशुक ; मांजरास हांकून लावण्यासाठीं करावयाचा आवाज . [ घ्व . ]
 स्त्री. ( कु . ) फांस ; पेंच .
०हातावर   १ धाडसाचें काम करावयास सिध्द असणें ; अत्यंत शूर असणें . २ जिवावर उदार होऊन एखादें कार्य करण्यास उद्युक्त होणें ; जिवाकडे न पहाणें . शिरावर जागें राहणें , शिरावर , शिरीं असणें - एखाद्याच्या संरक्षणासाठीं , कल्याणासाठीं तत्पर असणें ; पाठ राखणें . श्रीरामा तूं स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा । - मो केकाआर्या , शिरीं आहे रामराज । औषधाचें कोण काज । - रामदास . शिरावर - ( एखादें कार्य ) पत्करणें . पेशवाईच्या रक्षणाची जोखीम आम्हीं आमच्या शिरावर घेतली आहे . - अस्तंभा १७ . शिरीं भार वहाणें - जबाबदारी पतकरणें ; हमी घेणें - पतकर घेणें ; सोसणें . शिरीं भार वाहेन बोले पुराणीं । - राम ३४ . शिरःकंप , शिरःकंपन - पुन . डोकें लटलट हालणें ; थरकापणें .
घेणें   १ धाडसाचें काम करावयास सिध्द असणें ; अत्यंत शूर असणें . २ जिवावर उदार होऊन एखादें कार्य करण्यास उद्युक्त होणें ; जिवाकडे न पहाणें . शिरावर जागें राहणें , शिरावर , शिरीं असणें - एखाद्याच्या संरक्षणासाठीं , कल्याणासाठीं तत्पर असणें ; पाठ राखणें . श्रीरामा तूं स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा । - मो केकाआर्या , शिरीं आहे रामराज । औषधाचें कोण काज । - रामदास . शिरावर - ( एखादें कार्य ) पत्करणें . पेशवाईच्या रक्षणाची जोखीम आम्हीं आमच्या शिरावर घेतली आहे . - अस्तंभा १७ . शिरीं भार वहाणें - जबाबदारी पतकरणें ; हमी घेणें - पतकर घेणें ; सोसणें . शिरीं भार वाहेन बोले पुराणीं । - राम ३४ . शिरःकंप , शिरःकंपन - पुन . डोकें लटलट हालणें ; थरकापणें .
०कमल   कमळ - न . ( काव्य ) ( कमलासारखें शिर ). शिर ; डोकें . [ शिर + कमल ]
०गीर  स्त्री. कोंबडयाच्या डोक्यावरील तुरा .
०गोम वि.  कपाळावर गोमेच्या आकाराचे , केस असलेला ( घोडा ). - स्त्री . घोडयाचें एक अशुभ चिन्ह . [ शिर + गोम ]
०च्छेद  पु. डोकें उडविणें ; वध . [ सं . शिरच्छेद ]
०टोप  पु. १ कानटोपी ; माकड टोपी ; घरांत घालण्याची टोपी ; टकोचें ; टोपडें . २ शिरस्त्राण .
०ताज   शिर्ताज - पु . डोक्यावरचा एक दागिना ; शिरोलंकार ; मुकुट . शिरीं शिरताज रे शिरीं शिरताज गातो भरून । - ऐपो २३७ . [ फा . शिर्ताज् ‍ ]
०दीदे   शिर्दीदे - क्रिवि . डोक्यावर ; मस्तकीं ; डोकीवर [ फा . सर - इ - दीदा ]
०पाव   शिर्पाव शिरोपाव - पु . १ राजा किंवा सरदार यांनीं कृपावंत होऊन दिलेलें पागोटें , वस्त्रें इ० बहुमानाचा पोशाख . मान पान , टिळा विडा व सिरपाव - वाडबाबा ३४ . १५ . जवाहीर , सिरोपाव वगैरे जिन्साना पाठविला । - जोरा ८ . २ जमाबंदीचे कतबे होण्याच्या वेळचा देशपांडे इ० चा हक्क . [ फा . सरोफा ] शिरपीडा - स्त्री . डोकेंदुखी . [ सं . ]
०पेंच   शिर्पेंच - पु . पागोटयांत खोंबण्याचा जडावाचा मोत्यांचा तुरा ; एक अलंकार . [ फा . सर्पेच ]
०फोडया वि.  भिक्षा मिळण्यासाठीं डोक्यावर हाणून घेणारा डोकें फोडून घेणारा ( भिकारी ); भिकार्‍यांची एक जात व तींतील व्यक्ति .
०बंद   शिर्बंन्द शिर्बस्ता - पु . पागोटें ; पगडी . [ फा . सर्बंन्द् ‍ ]
०भारी  स्त्री. डोक्यावर वाहून न्यावयाजोगें ओझें . [ शिर + भार ] शिरयाळें , शिरियाळें - न . डोक्याचा आधार ; डोक्याची बैठक . उभऊनि करतळें । पडिघाये कपोळें । पायाचे शिरियाळें । मांडूं लागे । - ज्ञा १४ . १८५ . [ शिरस् ‍ + आलय ; म . शिर + आळें ]
०वपन  न. हजामत ; विशेषतः विधवा बायकांचे केस काढणें ; विकेशा करणें . कैकयीचें शिरवपन करून । छत्र धरोत कोण्हीतरीं । शिरसा - क्रिवि . १ डोक्यानें . २ शिर वाकवून ; नम्रपणानें ; आदरयुक्त ; आज्ञाबरहुकुम . तुम्ही आमचे वडील , त्यापेक्षां तुम्ही सांगाल तें आम्हास शिरसा मान्य आहे . शिरसावंद्य , धार्य , मान्य - वि . अतिशय पूज्य ; आदरणीय ; माननीय . [ सं . ]
०साष्टांग   , साष्टांग दंडवत - पु . ( डोक्यासहित आठ गात्रें जमिनीवर टेकून ) अत्यंत नम्रतापूर्वक प्रणाम ( वडील माणसें , थोर किंवा श्रेष्ट व्यक्ति यांस लिहावयाचा पत्रांतील मायना ). [ शिरस् ‍ + अष्ट + अंग + नमस्कार , दंडवत ]
नमस्कार   , साष्टांग दंडवत - पु . ( डोक्यासहित आठ गात्रें जमिनीवर टेकून ) अत्यंत नम्रतापूर्वक प्रणाम ( वडील माणसें , थोर किंवा श्रेष्ट व्यक्ति यांस लिहावयाचा पत्रांतील मायना ). [ शिरस् ‍ + अष्ट + अंग + नमस्कार , दंडवत ]
०स्त्राण  न. डोक्याचें रक्षण , आच्छादन करणारें टोपी , पागोटें इ० . टोप ; जिरेटोप . [ सं . ]
०स्नात वि.  डोक्यावरून स्नान केलेला .
०स्नान  न. डोक्यावरून केलेली आंघोळ ; सबंध स्नान . शिरातोरा , शिरातोरा असणें - एखाद्याच्या वरचढ असणें ; - चा अधिकारी असणें . गणितांत तो माझा शिरातोरा आहे .
०लावणें   दाखविणें मिरविणें - शेखी मिरविणें ; वरचढपणा गाजविणें . खंडयाला पाटिलकी मिळाल्यापासून तो भारी शिरातोरा दाखवूं लागला आहे . शिरी - स्त्री . डोक्यावरील नक्षीचें , शोभिवंत कापड ( हत्ती , घोडा . इत्यादींच्या ). शिरीं - क्रिवि . डोक्यावर ; ऐनवेळीं . उदा० लग्नाच्या शिरीं , प्रसंगाच्या शिरीं , कामाच्या शिरीं .
०असणें   अग्रभागीं असणें ; संभाळणारा होणें . शिरीं असतां पंडरिनाथ । चिंता किमपि न करावी । शिरोग्रहस - पु . डोकें धरणें ; शिरोवेदना होणें ( रोग , विकृति इ० नें ). डोकें धरणारा ; डोक्यावर परिणाम करणारा ( रोग इ० ). [ सं . ] शिरोबस्ती - पु . डोकेंदुखी बंदकरण्याचा एक उपाय . शिरोबिंदु - पु . ( भूमिति ) अक्षाच्या समोरचें टोक , कोंण बिंदू . - महमा १२ , २० . शिरोभाग - पु . १ मानेपासून वरचा भाग ; डोक्याचा भाग . २ ( एखाद्या समाजाचा , संघाचा ) नायक , गुणांत योग्यतेनें उत्तम . शिरोभूषण - न . डोक्याला शोभा देणारी वस्तु ; अलंकार , इ० . मुकुट पागोटें ; टोपी . शिरोमणी - पु . १ डोक्यावरील दागिना ; मुगुटमणि . २ मुख्य , श्रेष्ठ इसम ; प्रमुख नायक . उदा० पंडित शिरोमणि , मूर्ख शिरोमणि , सोदाशिरोमणि . इ० बाप बळिया शिरोमणी । उताविळ या वचनीं । - तुगा १६४ . [ सं . ] शिरोरोग - डोक्यांतील बिघाड , रोग . त्याचे प्रकार - वातिक , पैत्तिक , श्लेष्मिक , सन्निपातिक ; रक्तक्षयज , कृमिज . शिरोलेख - पु . ( वृत्त . ) मथळा ; मायना ; शीर्षक ; लेखारंभीं लिहिलेलें वाक्य . ( इं . ) हेडिंग . शिरोलेखांत लिहिल्याप्रमाणें अद्याप ८।१० दिवसांचा अवकाश आहे . - टि २७२ . शिरोवेदना - स्त्री . डोकेंदुखी ; शिरपीडा . मोठी शिरोवेदना होत आहे . - कर्म ४ . शिरोवेष्टन - न . कोणतेंहि डोक्याला गुंडाळावयाचें वस्त्र ; ( रुमाल , पागोटें वगैरे ). [ सं . ]

शिर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  शरीरमा घाँटीको अगाडि वा उपल्लो भाग   Ex. शिरमा चोट लाग्यो भने मान्छेको ज्यान जान पनि सक्छ/काली माताको घाँटीमा मुण्डमाला सुशोभित छन्
HOLO COMPONENT OBJECT:
शरीर
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टाउको मस्तक
Wordnet:
asmমূৰ
bdखर
benমাথা
gujમાથું
hinसिर
kanತಲೆ
kokतकली
malതല
marमस्तक
mniꯀꯣꯛ
oriମୁଣ୍ଡ
panਸਿਰ
sanशीर्षम्
tamதலை
telతల
urdسر , منڈی
See : टुप्पो

शिर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
शिर  m. 1.m. = शिरस्, the head, [MBh.] ; [Pañcar.] &c.
सिर   the root of Piper Longum, [L.] (v.l.)
Betula Bhojpatra, [L.]
a Boa, [L.]
a bed, couch, [L.]
शिर   2. in comp. for शिरस्.

शिर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
शिर  n.  (-रं)
1. The head.
2. The root of the pepper plant.
 f.  (-रा) Any vessel of the body, really or supposed to be, of a tubular form, as [Page719-a+ 60] a nerve, a tendon, a gut, &c.
 m.  (-रः)
1. A bed.
2. A large serpent.
E. शॄ to injure, aff.: see शिरस् .
ROOTS:
शॄ शिरस् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP