|
न. झाडाचें पाळ . मूल शब्द अर्थ २ पहा . मूळपुरुष ; आदिपुरुष ; वंशसंस्थापक . आरंभ ; सुरवात ; उगम ; उत्पत्ति . ज्यावर टीका केलेली असते तो ग्रंथ . मुख्य , प्रधान वस्तु , गोष्ट . एकोणिसावें नक्षत्र . ( गणित ) एखाद्या वर्ग किंवा घन संख्येची मूळ संख्या ; उदा० वर्गमूळ . बोलावणें ; आमंत्रण ; नवीन लग्न झालेल्या मुलीला नेण्याकरतां आलेला इसम ; नवर्याला लग्नाकरितां बोलाविण्यास गेलेला इसम ; एखाद्या माणसाला घेऊन येण्याकरितां गेलेला मनुष्य ; माघारी . केला लग्नाचाही निश्चय चैद्यासि धाडिलें मूळ । - मोकृष्ण ८३ . १९ . [ सं . मूल ] ( वाप्र . ) ०काढणें खणणें झाडणें पुसणें मोडणें मारणें निर्मूळ करणें - सर्वस्वीं नाश करणें ; पूर्णपणें बिघाड , नाश उच्छेद , विध्वंस , संहार करणें . ०चा मुळचा - वि . मुळांतला ; प्रारंभींचा ; सुरवातीचा . ०जाणें मुलीला सासर्याहून आणण्यासाठीं तिच्या माहेरच्या माणसानें जाणें ; बोलावण्यास , आमंत्रण करावयास जाणें . ०धाडणें बोलावणें पाठविणें ; घेऊन येण्याकरितां इसम पाठविणें . मूळावर जन्मणें मूळ नक्षत्रावर जन्म होणें ; दुसर्याचा नाश होईल अशा अशुभ नक्षत्रावर जन्म होणें ; मुळावर येणें , बसणें एखाद्याच्या नाशाला कारण होणें , असणें . ( विशेषतः कुयोगावर जन्मल्यामुळें आईबापांच्या नाशास कारणीभूत झालेल्या मुलाबद्दल उपयोग करतात ). मुळाशीं हात घालणें तत्त्वाशीं गांठ ठेवणें ; तत्त्व न सोडणें . बाह्योपाधीकडे लक्ष न देतां प्रत्येकानें मुळाशीं हात घातला पाहिजे . - टि २ . ५९५ . मुळाहून , मुळाधरुन मुळापासून ; आरंभापासून ; सुरवातीपासून ; सामाशब्द - ०अहंता स्त्री. मूलप्रकृति ; मूळमाया ; ब्रह्मांडीचा महाकारण देह . ०अक्षरें नअव . लिहिण्यास शिकवितांना प्रथम शिकवावयाचीं अक्षरें ; वर्णमाला . मूळाक्षरांचें पुस्तक न . वर्णमाला शिकविण्याचें पुस्तक मूळ आचार पु . उदय ; वाढ ; प्रगति ; उत्कर्ष . ( मूलाधार शब्दांचें हें अपभ्रष्ट रुप असावें ) मूळक , मूळिक , मुळिक वि . पहिलें ; मूळचें . ना तरी दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं । मीनलिया अवलोकीं । होय जैसें । - ज्ञा १४ . ५५ . मूळकरी पु . ( व . ) मुलीस , सुनेस आणण्याकरितां पाठविलेला मनुष्य . ०कर्म न. मूलभूत काम ; सुरवातीचें कार्य ; आद्यकर्तव्य . ( गणित ) एखाद्या संख्येचें वर्गमूळ काढणें . ०किडा पु ( व . ) बैलाच्या शिंगांत उत्पन्न होणारा एक किडा . याच्या योगानें शिंग हलूं लागतें व गळून पडतें . ०खंड कंड - न . ( अशिष्ट ) मुळी ; मुळाचा तुकडा . ( व . ) झाडाची जाड मुळी . [ मूळ + खंड = तुकडा ] ०गांव न एखाद्या घराण्याचा अगर वंशाचा मूळपुरुष ज्या गांवीं राहत असे तो गांव ; वाडवडील राहत आले तो गांव . ०ग्रंथ पु. मूळचा ग्रंथ ; ज्यावर टीका लिहिली तो , आधारभूतग्रंथ . ( ल . ) आधार ; पाया ; मूळची हकीकत ; सुरवातीचें कारण . मूळग्रंथ कळल्यावांचून कज्जाचा न्याय होत नाहीं . ०घटक पु. ( रसा . ) पदार्थाचा मूळचा घटकावयव . ०चिठी स्त्री. आमंत्रणपत्रिका ; कुंकुमपत्रिका . त्वरित मुळचिठ्या त्या सोयर्यांला लिहील्या । - सारुह ३ . ३३ . ०डाळ न. मूळ , पाळ वगैरे . - तुगा . ०द्रव्य धन - न . भांडवल ; व्यापारांत गुंतविलेला पैसा . ०नक्षत्री वि. मूळ नक्षत्रावर जन्मलेला . येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकीं आहे फळ । परी तें त्यजिजे मूळ । नक्षत्री जैसें । - ज्ञा १८ . १२३ . ०पत्र न. अस्सल पत्र ; मूळ दस्त ऐवज . परवानगीचा दाखला ; परवाना . आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । ते घेती नरकभूमी । मूळपत्र । - ज्ञा १४ . २७४ . ०पाटी स्त्री. ठाकरांत विवाहप्रसंगीं मुलाचा बाप लग्नाचें सामान ज्या टोपलींतून मुलीकडे नेतो ती टोपली . - बदलापूर १४७ . ०पीठ न. १ मूळस्थान ; देवता ज्या ठिकाणीं पहिल्यानें प्रगट झाली तें स्थान ; उगमस्थान . ओंकार मातृकांसकट । तोचि जाणावा कंबुकंठ । वेदाचें जें मूळपीठ । तेथून प्रकटे त्रिकांडी । - एरुस्व १ . ४२ . एखाद्याच्या पूर्वजांचें स्थान . ०पीठिका स्त्री आदिकारण ; प्रारंभ ; उगम ; ( एखाद्या देशाची , राष्ट्राची , कामा - प्रसंगाची ) सुरवातीची स्थिति . साग्र वृत्तांत ; समूळ हकीकत ; ( एखाद्या कामाचे - कृतीचे - प्रसंगाचे हकीकतीचे ) सर्व मुद्दे ; सर्व गोष्टी . अनुष्ठानाची मूळपीठिका ठाऊक असल्यावांचून ते करावयास येत नाहीं . ०पुरुष पु. एखाद्या वंशाचा किंवा घराण्याचा संस्थापक ; आद्यपूर्वज . कुलाध्यक्ष ; टोळीचा नायक ; घराण्यांतील मुख्य पुरुष . ०प्रकाशक पु. ( बीजगणित ) एखाद्या घातसंख्येचें मूळ ज्या आंकड्यानें दाखविलें जातें तो ; मूळदर्शक अंक . घाताचा मूळ प्रकाशक दाखविण्याच्या दोन रीति आहेत :- घात संख्येच्या आरंभीं V असें चिन्ह काढून त्यांत मूळदर्शक अंक लिहितात अथवा घातसंख्येचे वर उजवे बाजूस अपूर्णांक रीतीनें मूळ - दर्शक अंक मांडतात . - छअं १५३ . उदा० ३ V २७ , २७ १ / ३ V ४ , ४ १ / २ या वरील उदाहरणांत अनुक्रमें ३ आणि २ हे मूळ प्रकाशक होत . घात प्रकाशक पहा . ०प्रकृति स्त्री. आदिमाया . प्रकृति पहा . ०बंद ध - पु . वज्रासन ; योगशास्त्रांतील एक बंध , आसन . योगाभ्यासी साधक योनिस्थान दावून आणि गुदद्वार । संकुचित करुन अपानवायूची अधोगति मोडून ती उर्ध्व करितात . त्यायोगें प्राण आणि अपान यांचा संयोग करवितात . मूलस्थानाचें बंधन होतें म्हणून यास मूलबंध म्हणतात . त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरुनी धरी घाली घाली मूठ बंदीं गांठीं । - तुगा २५८ . ०बांध बंद - पु . ( क . ) शेतांत पाणी अडविण्यासाठीं घातलेला बंधारा . ०भूत वि. सर्वांस कारण असलेला ; आदिकारण . जय जय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्य निरस्ताखिलमळ । मूळभूत । - ज्ञा १८ . ४ . ०माधव विना . द्वारकेजवळील एका क्षेत्राचें नांव . वचना मानवला बळिदेवो । ऐकोनि हासिन्नला देवाधिदेवो । पाणिग्रहण मूळमाधवो । मुळीचा ठावो लग्नासी । - एरुस्व १४ . ३८ . ०माया स्त्री. आदिमाया . म्हणोन हें बोलणें होये । जाणीव मूळमाया । - दा १० . १० . १५ . ०मुहूर्त क्रिवि . प्रथमारंभीं ; सुरवातीला . ०वस वसा - पु . ( कों . ) खेडें , शेत इ० चें खालचें टोंक किवा बाजू ; प्रथम बस्तीची जागा . ०वैरी पु. हाडवैरी . वृत्रासुर आणि देवेंद्र । मूळवैरी झुंजती । - मुविराट ३ . १४८ . ०व्याध धि धी - स्त्री . एक गुदरोग . मुळव्याध पहा . ०शोधन न. उगम किंवा मूळ शोधणें . ०साडा पु. ( माण . ) नवर्यामुलीला मूळ धाडून व तिच्या सासूला साडीचोळी देऊन तिला परत घरीं नेणें ; नवरी ववसून नेणें . ०सूत्र न. सूत्ररुपानें असलेलें मूळ . एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । - ज्ञा १८ . १४२६ . ०स्तंभ पु. मुहूर्तमेढ ; घर बांधतांना जोत्यावर प्रथम उभा केलेला खांब . ज्यांत विश्चाची रचना , उभारणी वर्णिली आहे असा एक ग्रंथ . ०स्तंभारोपण न. मुहूर्तमेढ घालणें - पुरणें ; घर बांधावयास सुरवात करणें . ०स्वभाव पु. उपजत स्वभाव ; जन्मस्वभाव . त्याचें येळकोट . राहिना । मूळस्वभाव जाईना । - तुगा . ०हारी पु. मूळ आलेला मुर्हाळी पहा ०क्षेत्र न. घर ; निवासस्थान ; बसतिस्थान . गंधर्वनगरीं क्षण एक न राहावें । तैंचि करावें मूळक्षेत्र । - तुगा ३५३१ .
|