|
पु. संगीतशास्त्र व कला यांत प्रवीण तो - संशक २५ . पु. १ मुख्य ; म्होरका ; पुढारी ; सेनापति ; स्वामी ; धनी ; सूत्रधार . उदा० सेना - ग्राम - नट - नायक . रघुनायक , यदुनायक . - ज्ञा १ . १०३ . २ मुख्य पात्र . ज्याचे चरित्र काव्य नाटकांत वर्णिले जाते किंवा ज्याच्या चरित्राच्या अनुरोधाने संविधानक रचले जाते तो पुरुष . ( हा नायिकेचा नवरा असतोच असे नाही ). ३ ( पोवाडा , लावणी इ० ) श्रृंगारिक काव्यामध्ये ज्याचे आश्रयाने श्रृंगार वर्णितात तो ; प्रधान वर्णनीय पुरुष ( स्त्रीला नायिका म्हणतात ). ४ गळ्यातील हाराच्या मधले रत्न . व नाईक पहा . स्वामी . करुनि वंदन जानकीनायका । ७ ( साहित्य ) चार प्रकारच्या नायकांपैकी प्रत्येक . नायकचतुष्ट्य पहा . [ सं . नी = नेणे , नायक ] ०चतुष्ट्य न. ( साहित्यशास्त्र ) धीरोदात्त , धीरप्रशांत , धीरललित आणि धीरोद्धत असे चार नायक . नायक हा यश , प्रताप , धर्म , काम , अर्थ या उद्धिष्टांप्रमाणे वागत असल्याचे दाखवितात . ०डा पु. महारजातीचा म्होरक्या ; महारांतील पुढारी . ०वडा डी , वाडी डी , नाईकवडी , नाईकुवडी , नाईकवाडी , नाईकुवाडी पु . १ पूर्वीचा जमीनमहसूल वसूल करणारा शिपाई . २ ( नायकवडा ) रामोशी , बेरड , यांचा म्होरक्या , नाईक . ३ जासूद ; ४ पायदळांतील किंवा किल्ल्यावरच्या दहा , वीस मनुष्यांवरचा अधिकारी . वसंतांची नायकवडी । खोचीति कोकिळांची धाडी । - भाए ४३४ . ५ सेनापति नायक . न मिळतां नायकवडी । दळांची आइती थोडी । - शिशु ४८० . ०वाडी स्त्री. नायकवाड्याचे काम . नायका स्त्री . कथानकांतील , काव्यांतील , समूहांतील वगैरे प्र . ख . स्त्री ; स्त्रीनायक . नायिका पहा . जे लक्ष्मी मुख्य नायका । न मनेचि एथ । - ज्ञा ९ . ३७६ . नायकी स्त्री . १ नायकाचे काम व हुद्दा . २ मालकी ; स्वामित्व . - वि . १ मालकीचे ; स्वामित्वाचे . २ पुढारी ; मुख्य असलेले ( राज्य , जात ). ३ ( संगीत ) गायनांत निरनिराळ्या रागांतील चीजा म्हणण्याचे गुरुपासून संपादन केलेले ( ज्ञान ). नायकी कानडा पु . ( संगीत ) एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव . वादी मध्यम , पंचम , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव षाडव . वादी मध्यम संवादी षड्ज . गानसमय मध्यरात्र . नायकीण स्त्री . १ नायकाची बायको ; नायिका . २ कारखान्यांत दाहा पांच स्त्रियांवर अधिकार , हुकमत गाजविणारी स्त्री ; मुकादमीण . ३ मालकीण ; धनीण ; सत्ताधीश स्त्री . ४ नाचणारीण ; कलावंतीण ; गाणारीण अविवाहित स्त्री ; कंचनी ; वेश्या . ५ ( गो . ) वेश्या ; व्यभिचारी स्त्री ; रखेली . म्ह ० नायकिणीच्या पोराळ दिसाची बापुय ना रातची आवय ना = नायकिणीच्या मुलाला दिवसाचा बाप दिसणे शक्य नाही व रात्रीच्या वेळी आई मिळणे शक्य नाही . नायको पु . ( कु . ) दशावतारांतील सूत्रधार ( याच्याकडे फक्त पदे म्हणण्याचे वगैरे काम असते ). नायक्या बैल पु . बैलांच्या रांगेतील पुढचा बैल .
|