मना तूं चंचल भारी० ॥ जाऊं नकोरे भटकाया दूरी ॥मना तूं०॥धृ॥
हरिपद सोडुनी जाशील जरी तूं । तरी दुःख होईल भारी ।
म्हणुनी अखंड हरिपद धरी । मना तूं० ॥१॥
हरिपद हृदयीं धरुनी दृढ तूं । राहे स्थीर क्षणभरी ।
तेणें हरिपद येईल करीं ॥ मना तूं० ॥२॥
वारी म्हणे बा सूज्ञ मना तूं । भक्ति हरिची करी ।
निजसुख येवुनी तुजला वरी, ॥मना तूं० ॥३॥