मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐ...

भक्ति गीत कल्पतरू - झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐ...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐसें झालें पाहिजे ।

स्वसुखाचें तेज मुखावर । दिसलें पाहिजे ॥मनारे॥धृ०॥

अखंड अभ्यासाने वृत्ती । स्वरुपीं मिळवुनी या तिजप्रती ।

येवुनीया मग देहावरती । स्वानंदा भोगिजे ॥मनारे॥ऐसें० ॥१॥

सर्वांठायीं वस्तु एकची । आस्ती भाती दिसे ती प्रियची ।

मना अशी ती गोडी त्याची । लावुनी घेईजे ॥मनारे॥ऐसें ॥२॥

द्रुष्टा साक्षी असे मी जाणुनी । सुखदुःखातें परोक्ष मानुनी ।

स्वस्वरुपीं ही वृत्ती रंगवुनी । हरीगुण गाईजे ॥मनारे ॥ऐसें० ॥३॥

गातां गातां सहज सुखाची । प्राप्ती होईल स्वानंदाची ।

ऐसी वृत्ति केली वारीची । सद्‌गुरुराजे ॥मनारे ॥ऐसे० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP